unfoldingWord 49 - देवाचा नवा करार
概要: Genesis 3; Matthew 13-14; Mark 10:17-31; Luke 2; 10:25-37; 15; John 3:16; Romans 3:21-26, 5:1-11; 2 Corinthians 5:17-21; Colossians 1:13-14; 1 John 1:5-10
文本编号: 1249
语言: Marathi
听众: General
类型/流派: Bible Stories & Teac
目的: Evangelism; Teaching
圣经摘录: Paraphrase
状态: Approved
脚本是翻译和录制成其他语言的基本指南,它们需要根据实际需要而进行调整以适合不同的文化和语言。某些使用术语和概念可能需要有更多的解释,甚至要完全更换或省略。
文本正文
देवाच्या एका दूताने मरियेस सांगितले की ती देवाच्या पुत्रास जन्म देणार आहे.म्हणून ती कुमारी असतांनाच तिने एका पुत्रास जन्म दिला आणि त्याचे नाव येशू ठेवले.म्हणून येशू हा देव व मनुष्य दोन्ही आहे.
येशूने अनेक चमत्कार करून आपण देव असल्याचे प्रमाण पटवून दिले.तो पाण्यावर चालला, वादळ शांत केले, अनेक आजा-यांना बरे केले, दुष्टात्म्यांना बाहेर काढले, मेलेल्यांना जिवंत केले व पाच भाकरी व दोन मासळ्यांद्वारे 5,000 पेक्षा अधिक लोकांना पोटभर जेवू घातले.
येशू हा एक महान शिक्षक सुद्धा होता व देवाचा पुत्र असल्यामुळे अधिकारवाणीने बोलत होता.त्याने शिकविले की आपण जशी आपल्यावर प्रीती करतो तशी आपण दुस-यांवरही प्रीती केली पाहिजे.
त्याने असे सुद्धा शिकवले की आपण आपल्या इतर सर्व वस्तूपेक्षा, संपत्तीपेक्षा देवावर अधिक प्रिती करायला पाहिजे.
येशूने म्हटले की जगात जे सर्वकाही आहे त्यापेक्षा देवाचे राज्य हे अधिक मौल्यवान आहे.कोणाही मनुष्यासाठी तो देवाच्या राज्याचा घटक असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हास तुमच्या पापांपासुन तारले जाण्याची आवश्यकता आहे.
येशूने शिकवले की काही लोक त्याचा स्वीकार करतील व तारण पावतील, परंतु काहीजण त्यास नाकारतील.त्याने म्हटले की काही लोक सुपिक जमिनीप्रमाणे आहेत.ते येशूची सुवार्ता स्वीकारून तारण पावतात.इतर लोक वाटेवरल्या कठीण जमिनीसारखे आहेत. ज्या ठिकाणी देवाचे वचन खोलवर न गेल्यामुळे निष्फळ ते ठरते.ते लोक येशूचा संदेश नाकारतात व त्यामूळे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत.
येशूने शिकवले की देव पाप्यांवर फार प्रेम करतो.तो त्यांना क्षमा करू इच्छितो व त्यांना आपली लेकरे बनवू पाहतो.
देवाला पापाचा वीट आहे असेही येशूने सांगितले.जेव्हा आदाम व हव्वा यांनी पाप केले, तेव्हा ते सर्व मानवजातीमध्ये पसरले.त्याचा परिणाम म्हणून आज प्रत्येक व्यक्ति पाप करतो व देवापासून दूर होते.म्हणून, प्रत्येक मनुष्य हा देवाचा वैरी झाला आहे.
परंतु देवाने जगातील प्रत्येक मनुष्यावर एवढी प्रिती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो येशू त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणार नाही, पण देवाबरोबर सदासर्वकाळ राहील.
तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात.देवाचा क्रोध तुमच्यावर यावयास हवा होता, पण त्याने तुमच्याऐवजी आपला क्रोध येशूवर ओतला.जेंव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला, तेंव्हा त्याने तुमची शिक्षा स्वतःवर घेतली.
येशूने कधीच पाप केले नाही, परंतु त्याने तुमच्या व जगातील प्रत्येक मनुष्यांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेण्याचे निवडले व आपल्या मरणाने परिपूर्ण प्रायश्चित्त भरुन दिले. येशूने दिलेल्या बलिदानामुळे, देव आपणांस आपल्या सर्व पापांची क्षमा करू शकतो.
चांगल्या कामांनी आपले तारण होऊ शकत नाही.देवाबरोबर समेट घडवून आणण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही.केवळ येशूच तुमची पापे मिटवू शकतो.तुम्ही असा विश्वास धरिला पाहिजे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, व देवाने त्यास पुन्हा जिवंत केले आहे.
जो येशूवर आपला वैयक्तिक तारणारा म्हणून विश्वास ठेवितो, व त्याला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो देव त्याचे तारण करील.परंतु तो विश्वास न ठेवणाऱ्याचे तारण करणार नाही.तुम्ही गरीब किंवा श्रीमंत, स्त्री किंवा पुरूष, तरूण किंवा वृद्ध असा किंवा तुम्ही कोठे राहता हे महत्त्वाचे नाही.देव आपणांवर प्रिती करतो व आपण येशूवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे, अशासाठी की त्याने आम्हाबरोबर जवळचे नातेसंबंध जोडावे.
येशू आपणांस आमंत्रण देत आहे यासाठी की तुम्ही विश्वास धरावा व बाप्तिस्मा घ्यावा.येशू हा मसिहा, देवाचा एकूलता एक पुत्र आहे असा तुम्ही विश्वास ठेविता का?आपण पापी आहोत व देवाकडून होणाऱ्या दंडास आपण पात्र आहोत याचा आपण स्वीकार करता काय?येशू आपल्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला यावर आपण विश्वास ठेवता काय?
जर आपण येशूवर विश्वास ठेवता व त्याने तुमच्यासाठी जे केले त्यावर विश्वास ठेवता तर आपण ख्रिस्ती आहात!देवाने आपणांस सैतानाच्या अंधःकारमय राज्यातून काढून आपल्या प्रकाशाच्या राज्यामध्ये आणिले आहे.देवाने आपला जुना पापी स्वभाव काढून आपणाला नवीन स्वभाव दिला आहे, ज्याच्यायोगे आपण न्यायीपणाची कामे करु शकतो.
जर आपण ख्रिस्ती आहात, तर येशूने केलेल्या कामामुळे देवाने आपणांस क्षमा केली आहे.आता शत्रुऐवजी देव आपणांस त्याचा जवळचा मित्र असे समजतो.
जर आपण देवाचे मित्र व प्रभु येशूचे सेवक आहात, तर तुम्हाला येशू जे कांही शिकवील त्याचे पालन करण्याची इच्छा होईल.जरी आपण ख्रिस्ती आहात, तरी आपल्याला पाप करण्याचा मोह होऊ शकतो.परंतु देव विश्वासू आहे आणि म्हणतो की जर आपण आपल्या पापांचा स्वीकार केला, तर तो आपणांस क्षमा करील.पापाविरूद्ध लढण्यासाठी तो आम्हास शक्ति देईल.
देव आम्हास प्रार्थना करण्यास, त्याच्या वचनाचा अभ्यास करण्यास, इतर ख्रिस्ती लोकांसोबत त्याची आराधना करण्यास व त्याने तुम्हासाठी काय केले आहे इतरांना सांगण्यास सांगतो.ह्या सर्व गोष्टी आपणांस देवाबरोबर सखोल नातेसंबंध ठेवण्यास मदत करतात.