unfoldingWord 40 - येशूला वधस्तंभावर खिळतात
เค้าโครง: Matthew 27:27-61; Mark 15:16-47; Luke 23:26-56; John 19:17-42
รหัสบทความ: 1240
ภาษา: Marathi
ผู้ฟัง: General
เป้าหมายของสื่อบันทึกเสียง: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
สถานะ: Approved
บทความเป็นแนวทางพื้นฐานสำหรับการแปลและบันทึกเสียงภาษาอื่นๆ ควรดัดแปลงตามความจำเป็นเพื่อให้เข้าใจและเหมาะสมกับวัฒนธรรมและภาษาแต่ละภาษา คำศัพท์และแนวคิดบางคำที่ใช้อาจต้องอธิบายเพิ่มเติม หรือแทนที่ หรือตัดออก
เนื้อหาบทความ
सैनिकांनी येशूची थट्टा उडविल्यानंतर, ते त्यास वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यासाठी घेऊन गेले.ज्या वधस्तंभावर त्यास मारावयाचे होते तो वधस्तंभ त्यांनी त्याच्या खांद्यावर दिला.
तेंव्हा ‘‘कवटी’’ नाव असलेल्या ठिकाणी ते त्याला घेऊन आले आणि त्यांनी येशूच्या हातामध्ये व पायामध्ये खिळे ठोकले.परंतू येशू म्हणाला, ‘‘हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही.’’पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
येशूचे वस्त्र वाटून घेण्यासाठी सैनिकांनी चिठ्ठया टाकल्या.जेंव्हा त्यांनी हे केले, त्यावेळी ही भविष्यवाणी पूर्ण झाली, ’’ त्यांनी माझे वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी चिठ्ठया टाकल्या.’’
येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले.त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय?आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’तेंव्हा तो येशूला म्हणाला, ‘‘तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण ठेव.’’येशू त्यास म्हणाला, ‘‘आजच, तू मजबरोबर सुखलोकात असशील.’’
यहूदी पुढारी व जमावातील इतर लोकांनीही येशूची थट्टा केली.ते त्यास म्हणाले, ‘‘जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरुन खाली उतरुन ये व स्वत:चा बचाव कर!म्हणजे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू.’’
तेंव्हा भर दुपारी देशभर आकाशामध्ये काळोख निर्माण झाला. दुपारपासून तीन वाजेपर्यंत पृथ्वीवर काळोख होता.
तेंव्हा येशू मोठयाने म्हणाला, ‘‘पूर्ण झाले!हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो.’’तेंव्हा त्याने आपले डोके लेववून प्राण सोडिला.जेंव्हा येशू मरण पावला तेंव्हा मोठा भूकंप झाला आणि मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला.
आपल्या मृत्यूद्वारे, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला करुन दिला.येशूवर पहारा करत असलेल्या सैनिकाने हे सर्व पाहून उद्गारला, ‘‘खरोखर, हा मनुष्य निष्पाप होता.तो देवाचा पुत्र होता.’’
तेंव्हा योसेफ आणि निकदेम हे दोघे यहूदी पुढारी ज्यांनी येशू हा मशीहा आहे असा विश्वास ठेविला होता, पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले.त्यांनी त्याचे शरीर वस्त्रात गुंडाळून खडकामध्ये खोदलेल्या एका कबरेमध्ये ठेवले.मग त्यांनी त्या कबरेच्या दाराशी एक मोठी धोंड उभी करुन कबरेचे दार बंद केले.