unfoldingWord 28 - एक श्रीमंत तरुण अधिकारी
เค้าโครง: Matthew 19:16-30; Mark 10:17-31; Luke 18:18-30
รหัสบทความ: 1228
ภาษา: Marathi
ผู้ฟัง: General
เป้าหมายของสื่อบันทึกเสียง: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
สถานะ: Approved
บทความเป็นแนวทางพื้นฐานสำหรับการแปลและบันทึกเสียงภาษาอื่นๆ ควรดัดแปลงตามความจำเป็นเพื่อให้เข้าใจและเหมาะสมกับวัฒนธรรมและภาษาแต่ละภาษา คำศัพท์และแนวคิดบางคำที่ใช้อาจต้องอธิบายเพิ่มเติม หรือแทนที่ หรือตัดออก
เนื้อหาบทความ
एके दिवशी, एक श्रीमंत तरुण अधिकारी येशूकडे येऊन विचारु लागला,‘‘उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे?’’येशून त्यास म्हटले,‘‘तू मला ‘उत्तम’ असे का म्हणतोस?एका देवा शिवाय कुणीच उत्तम नाही.परंतु तुला सार्वकालिक जीवन हवे आहे, तर देवाच्या आज्ञा पाळ.’’
‘‘कोणत्या आज्ञा मी पाळावयाची आवश्यकता आहे?’’ त्याने विचारले.येशूने उत्तर दिले,‘‘खून करु नकोस.व्यभिचार करु नकोस.चोरी करु नकोस.खोटे बोलू नकोस.आपल्या आईबापाचा मान राख, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजा-यावर प्रीति कर.’’
परंतु त्या तरुणाने म्हटले,‘‘हया सर्व आज्ञा मी लहानपणापासूनच पाळत आलो आहे.सर्वकाळ जगण्यासाठी मला आणखी काय करण्याची गरज आहे?’’येशूने त्याच्याकडे पाहिले व त्याच्यावर प्रीती केली.
येशूने उत्तर दिले,‘‘जर तू पूर्ण होऊ पाहतोस, तर जा आणि तूझी सर्व मालमत्ता विकून आलेला पैसा गोरगरीबांस दे, म्हणजे तुला स्वर्गामध्ये संपत्ती मिळेल.मग ये आणि माझ्यामागे चालू लाग.’’
येशूचे हे बोलणे ऐकून तो तरुण खूप निराश झाला, कारण तो खूप श्रीमंत होता व आपल्या जवळची मालमत्ता दुस-यास देऊ इच्छीत नव्हता.तो येशूपासून निघून गेला.
मग येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, “श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणे फार कठिण आहे!होय, श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा ऊंटाला सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.’’
जेंव्हा शिष्यांनी हे ऐकले तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला व ते म्हणाले, ‘‘तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?’’
येशूने शिष्यांकडे पाहून म्हटले, ‘‘मनुष्यांस हे अशक्य आहे, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे.’’
पेत्र येशूला म्हणाला, ‘‘आम्ही सर्व सोडून तुझ्या पाठीमागे आलो आहोत.याचे आम्हास काय प्रतिफळ मिळणार?’’
येशूने उत्तर दिले,‘‘ज्यांनी माझ्यासाठी घरे, भाऊ, बहिणी, माता, पिता, लेकरे किंवा मालमत्ता सोडली आहे, त्यांना ती 100 पटीने जास्त मिळणार व त्याजबरोबर अनंत काळचे स्वर्गीय जीवन हे वतन मिळेल.’’परंतु पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले असे पुष्कळांचे होईल’’