unfoldingWord 15 - वचनदत्त देश
เค้าโครง: Joshua 1-24
รหัสบทความ: 1215
ภาษา: Marathi
ผู้ฟัง: General
เป้าหมายของสื่อบันทึกเสียง: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
สถานะ: Approved
บทความเป็นแนวทางพื้นฐานสำหรับการแปลและบันทึกเสียงภาษาอื่นๆ ควรดัดแปลงตามความจำเป็นเพื่อให้เข้าใจและเหมาะสมกับวัฒนธรรมและภาษาแต่ละภาษา คำศัพท์และแนวคิดบางคำที่ใช้อาจต้องอธิบายเพิ่มเติม หรือแทนที่ หรือตัดออก
เนื้อหาบทความ
शेवटी आता इस्राएलांना कनानामध्ये, वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्याची वेळ आली.यहोशवाने कनानी शहर यरीहो जे मोठ्या वेशींनी सुरक्षित केले गेले होते, तेथे दोन हेरांस हेरगिरी करण्यास पाठविले.त्या शहरामध्ये रहाब नावाची एक वेश्या राहत होती. तिने त्या हेरांना आपल्या घरामध्ये लपवले व नंतर त्यांना निसटून जाण्यास मदत केली.तिने असे केले कारण तिने देवावर विश्वास ठेवला होता.जेव्हा इस्राएल लोक यरीहोचा नाश करतील तेव्हा रहाब व तिच्या घराण्याचे रक्षण करण्याचे त्यांनी वचन दिले.इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते.
देवाने यहोशवास सांगितले, "प्रथम याजकांस पुढे जाऊ द्या."जेव्हा याजकांच्या पायाचा स्पर्श पाण्यास झाला तेव्हा यार्देन नदीचा वरून येणारा प्रवाह बंद झाला व इस्राएल लोक कोरड्या जमिनीवरून चालत नदीच्या पलिकडे जाऊ शकले.यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.
लोकांनी देवाच्या आज्ञेचे पालन केले.देवाने सांगितल्या प्रमाणेच सर्व सैनिकांनी व याजकांनी यरीहो शहरास सहा दिवस प्रत्येकी एक वेळा प्रदक्षिणा घातल्या.मग सातव्या दिवशी, इस्राएलांनी आणखी सात वेळा शहरास प्रदक्षिणा घातल्या.
शेवटच्या वेळी प्रदक्षिणा घालत असतांना सैनिकांनी गर्जना केल्या व याजकांनी आपली कर्णे वाजवले.मग यरीहो शहराच्या भिंती कोसळल्या.
देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएलांनी शहराचा नाश केला.त्यांनी केवळ राहाब व तिच्या कुटुंबास जिवंत ठेविले, जे नंतर इस्राएलांचा एक भाग बनले.जेव्हा कनानमध्ये राहणा-या इतर लोकांनी ऐकले की इस्राएलांनी यरीहो नगराचा नाश केला आहे, तेव्हा इस्त्राएली लोक त्यांच्यावरही हल्ला करतील याची त्यांना भिती वाटली.देवाने इस्राएलास आज्ञा केली होती की त्यांनी कनानी लोकांबरोबर शांतीचा करार करु नये.
परंतु गिबोनी नावाचा कनानामधील एक लोकगट यहोशवाबरोबर खोटे बोलला ते म्हणाले की ते कनानापासून खूप लांब रहातात.त्यांनी यहोशवास त्यांच्यासोबत शांतीचा करार करण्यास विनंती केली.यहोशवा व इस्राएल यांनी गिबोनी लोक कोठून आले होते याची देवाकडे विचारपूस केली नव्हती.
म्हणून यहोशवाने त्यांच्याशी शांतीचा करार केला.जेव्हा इस्राएलास समजले की गिबोनी लोकांनी त्यांची फसवणूक केली आहे, तेव्हा ते खूप रागावले, पण तरीही त्यांनी तो करार पाळला कारण त्यांनी देवासमोर त्यांना वचन दिले होते.काही काळानंतर, कनानामधील इतर लोकगटाच्या राजांनी, अमोरी लोकांनी, ऐकले की गिबोनी लोकांनी इस्राएलाबरोबर करार केला आहे, तेव्हा त्यांनी आपले सैन्य एकत्र करून गिबोन्यांवर हल्ला केला.गिबोन्यांनी यहोशवाकडे संदेश पाठविला व त्यांना मदत करण्याची विनंती केली.यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या सैनिकांस जमा केले व गिबोन्यांकडे पोहोचण्यासाठी रात्रभर चालत राहिले.
पहाटेच त्यांनी अमोरी सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला व त्यांच्यावर हल्ला केला.त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला.
त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.देवाने सुद्धा सूर्यास आकाशात एका जागी स्थिर राहाण्याची आज्ञा केली कारण इस्राएलांना अमो-यांचा पुर्णपणे नाश करण्यास वेळ मिळावा.
त्या दिवशी देवाने इस्राएलाला मोठा विजय प्राप्त करून दिला.देवाने त्या सैनिकांस पराजित केल्यानंतर, अनेक कनानी लोकगटांनी एकत्र येऊन इस्त्राएलावर चढाई केली.
यहोशवा आणि इस्राएलांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा नाश केला.या लढाईनंतर देवाने इस्राएलाच्या प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली.
त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.जेव्हा यहोशवा वृद्ध झाला, तेव्हा त्याने सर्व इस्राएली लोकांस एकत्र बोलावले.
मग यहोशवाने इस्राएली लोकांस देवाने त्यांच्याशी केलेल्या सीनाय पर्वतावरील कराराचे स्मरण करून दिले की त्यांनी देवाच्या आज्ञा पाळाव्यात.सर्व लोकांनी देवाशी विश्वासू राहण्याचे व त्याच्या आज्ञा पाळण्याचे वचन दिले.बायबल कथाः