unfoldingWord 32 - येशू एका भूतग्रस्त मनुष्यास व आजारी स्त्रीस बरे करितो
เค้าโครง: Matthew 8:28-34; 9:20-22; Mark 5; Luke 8:26-48
รหัสบทความ: 1232
ภาษา: Marathi
ผู้ฟัง: General
เป้าหมายของสื่อบันทึกเสียง: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
สถานะ: Approved
บทความเป็นแนวทางพื้นฐานสำหรับการแปลและบันทึกเสียงภาษาอื่นๆ ควรดัดแปลงตามความจำเป็นเพื่อให้เข้าใจและเหมาะสมกับวัฒนธรรมและภาษาแต่ละภาษา คำศัพท์และแนวคิดบางคำที่ใช้อาจต้องอธิบายเพิ่มเติม หรือแทนที่ หรือตัดออก
เนื้อหาบทความ
एके दिवशी, येशू आणि त्याचे शिष्य नावेमध्ये बसून समुद्राच्या पलिकडे गरसेकर राहात असलेल्या प्रदेशात गेले.
सरोवराच्या पलिकडे जाताच एक भूतग्रस्त मनुष्य येशूकडे धावत आला.
हा मनुष्य एवढा शक्तिशाली होता की कोणीही मनुष्य त्याला नियंत्रीत करु शकत नव्हता.लोकांनी त्याचे दंड व पाय साखळदंडांनी व बेडयांनी बांधले, परंतू त्या तो तोडत असे.
तो मनुष्य कबरींमध्ये रहात असे.तो रात्रंदिवस मोठयाने ओरडत असे.तो अंगावर कपडे घालत नसे व आपले अंग दगडांनी वारंवार ठेचून घेत असे.
जेंव्हा तो मनुष्य येशूकडे आला, तेंव्हा येशूसमोर येऊन त्याने गुडघे टेकले.येशू त्या दुष्टात्म्यास म्हणाला, ‘‘हया मनुष्यातून बाहेर निघ!’’
भूतग्रस्त मनुष्य मोठयाने ओरडला, ‘‘परात्पर देवाच्या पुत्रा येशू , तू मध्ये का पडतोस?’’कृपया मला छळू नकोस !’’तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)
ते दुष्टात्मे येशूला विनवणी करु लागले, ‘‘कृपया आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नका!’’शेजारच्या टेकडीवर डुकरांचा एक कळप चरत होता.म्हणून, दुष्टात्म्यांनी विनंती केली, “कृपया त्याऐवजी आम्हास डुकरांमध्ये पाठवा!’’येशू म्हणाला, ‘‘जा!’’
तेंव्हा दुष्टात्मे त्या माणसामधून निघून डुकरामध्ये घुसले.तेंव्हा ती डुकरे कड्यावरुन खाली पळत गेली व समुद्रामध्ये बुडाली.त्या कळपामध्ये सुमारे 2000 डुकरे होती.
हे पाहून डुकरे राखणारे धावत नगरामध्ये गेले व त्यांनी झालेला हा प्रकार व येशूने काय केले हे प्रत्येकाला सांगितले.तेंव्हा नगरातील लोकांनी येऊन त्या भूतग्रस्त मनुष्यास पाहिले.तो शांत बसलेला, अंगावर कपडे घातलेला, व एक सर्वसामान्य वागणा-या माणसा सारखा असा त्यांनी त्याला पाहिला.
हे पाहून लोक फार घाबरले व त्यांनी येशूला त्यांचा प्रांत सोडून जाण्यास सांगितले.तेंव्हा येशू मचव्यात बसून जाण्यासाठी तयार झाला.पूर्वी भूतग्रस्त असलेला मनुष्य येशूच्या बरोबर जाण्यासाठी विनंती करु लागला.
परंतू येशू त्यास म्हणाला, ‘‘नाही, तू आपल्या घरी जा व आपल्या मित्रांस व कुटुंबियांस सर्व सांग की देवाने तुझ्यासाठी काय केले व तुझ्यावर कशी दया दाखविली आहे.’’
तेंव्हा तो मनुष्य निघाला व देवाने त्याच्या साठी काय केले आहे याची साक्ष प्रत्येकाला त्याने दिली.हे ऐकणारा प्रत्येकजण आश्चर्याने थक्क झाला.
येशू सरोवराच्या पलिकडे परत गेला.तो तेथे पोहोचल्यानंतर, लोकांचा मोठा समुदाय त्याच्याभोवती जमला व ते त्याच्यावर पडू लागले.त्या समुदायामध्ये बारा वर्षापासून रक्तस्रावाची पीडा होत असलेली एक स्त्री होती.तिने आपला सर्व पैसा वैद्यांवर खर्च केला पण तरीही ती बरी झाली नाही, तर तिची परिस्थिती आणखी वाईट झाली.
तिने ऐकले होते की येशूने अनेक रोग्यांना बरे केले आहे आणि ती म्हणाली, ‘‘मला खात्री आहे की, जर मी केवळ येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, तरीही बरी होईन!’’म्हणून तीने येशूच्या मागे जाऊन त्याच्या वस्त्रास स्पर्श केला.तिने वस्त्राला स्पर्श करताच तीचा रक्तस्राव थांबला!
ताबडतोब, येशूला कळले की त्याच्या शरीरामधून सामर्थ्य गेले आहे.म्हणून त्याने मागे वळून पाहिले व म्हटले,‘‘मला कोणी स्पर्श केला?’’
शिष्यांनी उत्तर दिले, ‘‘लोकांची एवढी गर्दी तुमच्याभोवती आहे व ते तुम्हाला चेंगरत आहेत.तर तूम्ही असे का विचारले, ‘‘मला कोणी स्पर्श केला?’’त्या स्त्रीने भितीने कापत कापत येशूपुढे जाऊन गुढगे टेकले.मग तिने काय केले व ती कशी बरी झाली ते त्याला सांगितले.येशूने तिला म्हटले, ‘‘तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.शांतीने जा.’’