unfoldingWord 23 - येशूचा जन्म
เค้าโครง: Matthew 1-2; Luke 2
รหัสบทความ: 1223
ภาษา: Marathi
ผู้ฟัง: General
ประเภท: Bible Stories & Teac
เป้าหมายของสื่อบันทึกเสียง: Evangelism; Teaching
ข้ออ้างอิงจากพระคัมภีร์: Paraphrase
สถานะ: Approved
บทความเป็นแนวทางพื้นฐานสำหรับการแปลและบันทึกเสียงภาษาอื่นๆ ควรดัดแปลงตามความจำเป็นเพื่อให้เข้าใจและเหมาะสมกับวัฒนธรรมและภาษาแต่ละภาษา คำศัพท์และแนวคิดบางคำที่ใช้อาจต้องอธิบายเพิ่มเติม หรือแทนที่ หรือตัดออก
เนื้อหาบทความ
मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मीक पुरुषाबरोबर झाले होते.मरीया गरोदर असल्याचे ऐकून त्याला कळले की, हे बाळ त्याचे नव्हे.तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली.त्याने असे करण्यापूर्वी, एक देवदूत त्याच्या स्वप्नामध्ये आला व त्याच्याशी बोलला.
देवदूत म्हणाला,‘‘योसेफा, मरीयेस तू आपली पत्नी म्हणून स्विकारण्यास भिऊ नकोस.तिच्या उदरामध्ये असणारे बाळ हे पवित्र आत्म्यापासून आहे.ती एका मुलास जन्म देईल.व त्याचे नाव येशू (अर्थात, ‘देव तारितो’) असे ठेव, कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.’’
तेंव्हा योसेफाने मरीयेशी विवाह केला व आपली पत्नी म्हणून तिचा स्विकार केला, परंतु त्या बाळाचा जन्म होईपर्यंत तो तिच्यापाशी निजला नाही.
जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा रोमी सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले.योसेफ आणि मरीया यांना नासरेथहून बेथलेहेम असा लांबचा प्रवास करावा लागला, कारण त्यांचा पूर्वज दाविद हा बेथलेहेम गावाचा होता.
बेथलेहेम येथे पोहोचल्यावर, त्यांना राहायला जागा मिळाली नाही.फक्त गुरांच्या गोठयामध्ये जागा होती ती त्यांना मिळाली.बाळाचा जन्म त्या गोठयामध्ये झाला व त्याच्या आईने त्यास गव्हाणीमध्ये ठेवले.त्यांनी त्याचे नाव येशू ठेवले.
त्या रात्री, काही मेंढपाळ आपली मेंढरे रानामध्ये राखीत होते.अचानक एक तेजस्वी देवदूत येऊन त्यांच्यासमोर प्रकट झाला, आणि ते खूप घाबरले.देवदूत म्हणाला, ‘‘भिऊ नका, कारण मी तुम्हास मोठ्या आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.आज बेथलेहेम नगरामध्ये तुमच्यासाठी मसिहा, अर्थात प्रभू जन्मला आहे!’’
‘‘जा आणि बाळाचा शोध घ्या, आणि तो तुम्हास बाळंत्याने गुंडाळलेला गव्हाणीमध्ये ठेवलेला दृष्टिस पडेल.’’अचानक, आकाशामध्ये देवदूत देवाची स्तूती करत म्हणाले,‘‘वर स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांवर त्याची कृपा झाली आहे त्यांस शांती!’’
मेंढपाळ लगेच येशूच्या जन्माच्या ठिकाणी पोहोचले आणि देवदूताने सांगितल्याप्रमाणे त्यांना ते बाळ गव्हाणीमध्ये ठेवलेले दृष्टीस पडले.हे पाहून त्यांना खूप आनंद झाला.मरीयेस ही खूप आनंद झाला.आपण जे पाहिले व ऐकले त्याविषयी आनंद करत मेंढपाळ आपल्या मेंढरांकडे परतले.
थोडया दिवसांनंतर, पूर्व दिशेला एक विशेष तारा ज्ञानी लोकांनी पाहिला.त्यांना समजले की, हा यहूद्यांचा एक नवा राजा जन्मास आला आहे.म्हणून त्याचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी फार मोठा प्रवास केला.ते बेथलेहेम येथे आले आणि जेथे येशू व त्याचे माता-पिता राहात होते ते घर त्यांनी शोधले.
जेव्हा त्या ज्ञानी लोकांनी येशू बाळास त्याची आई मरीया हिच्या बरोबर पाहिले तेव्हा त्यांनी त्याला नमन केले व त्याची उपासना केली.त्यांनी येशूबाळास मौल्यवान भेटवस्तू दिल्या.तेंव्हा ते आपल्या घरी परतले