unfoldingWord 34 - येशू अनेक गोष्टी शिकवितो
சுருக்கமான வருணனை: Matthew 13:31-46; Mark 4:26-34; Luke 13:18-21;18:9-14
உரையின் எண்: 1234
மொழி: Marathi
சபையினர்: General
செயல்நோக்கம்: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
நிலை: Approved
இந்த விரிவுரைக்குறிப்பு பிறமொழிகளின் மொழிபெயர்ப்பிற்கும் மற்றும் பதிவு செய்வதற்கும் அடிப்படை வழிகாட்டி ஆகும். பல்வேறு கலாச்சாரங்களுக்கும் மொழிகளுக்கும் பொருத்தமானதாக ஒவ்வொரு பகுதியும் ஏற்ற விதத்தில் இது பயன்படுத்தப்படவேண்டும்.சில விதிமுறைகளுக்கும் கோட்பாடுகளுக்கும் ஒரு விரிவான விளக்கம் தேவைப்படலாம் அல்லது வேறுபட்ட கலாச்சாரங்களில் இவை தவிர்க்கப்படலாம்.
உரையின் எழுத்து வடிவம்
येशूने देवाच्या राज्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या.उदाहरणार्थ, तो म्हणाला, ‘‘देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे जे कोणीएकाने आपल्या शेतात पेरले.तुम्हास ठाऊक आहे की मोहरीचा दाणा हा सर्व बीजांमध्ये अगदी लहान आहे.’’
परंतू जेंव्हा हा मोहरीचा दाणा उगवुन वाढतो तेंव्हा बागेतील इतर झुडपांपेक्षा ते सर्वत मोठे होऊन इतके वाढते की, आकाशातील पाखरेही येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात.’’
येशूने आणखी एक गोष्ट सांगितली, ‘‘देवाचे राज्य खमिरासारखे आहे जे एका स्त्रीने पिठामध्ये घातले व संपूर्ण पीठ फुगून गेले.’’
‘‘देवाचे राज्य शेतामध्ये कुणीतरी लपवून ठेवलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे.दुस-या मनुष्यास ते सापडले व त्याने ते पुन्हा पुरुन ठेवले.त्याला एवढा आनंद झाला की त्याने आपली सर्व संपत्ती विकून आलेल्या पैशांनी ते शेत विकत घेतले.
‘‘देवाचे राज्य एका मौल्यवान मोत्यासारखे सुद्धा आहे.जेंव्हा मोत्याच्या व्यापा-याच्या ते दृष्टिस पडले, तेंव्हा त्याने त्याची सर्व मालमत्ता विकून टाकली व आलेल्या पैशांनी ते मौलवान मोती विकत घेतले.’’
तेंव्हा येशूने कांही लोकांस एक गोष्ट सांगितली जे स्वत:च्या चांगल्या कामावर भरवंसा ठेवत व दूस-या लोकांना तुच्छ मानीत असत.तो म्हणाला, ‘‘दोन माणसे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले.त्यांपैकी एक जकातदार व दूसरा एक धार्मिक पुढारी होता.’’
धार्मिक पुढा-याने अशी प्रार्थना केली, ‘‘हे देवा, मी तुला धन्यवाद देतो की मी अन्य मनुष्यांसारखा पापी नाही. जे चोरी, अन्याय, व्यभिचार करतात त्यांच्याप्रमाणे मी नाही, व हया जकातदारासारखाही नाही.”
‘‘उदाहरणार्थ, मी आठवड्यातून दोनदा उपास करितो आणि आपल्या सर्व उत्पन्नाचा दशांश तुला देतो.’’
‘‘परन्तु तो जकातदार त्या धार्मिक पुढा-यापासून फार दूर उभा होता, आणि वर स्वर्गाकडेही पाहात नव्हता.त्याऐवजी, त्याने आपल्या हातांनी छाती बडवून घेतली आणि प्रार्थना केली, ‘‘देवा, मज पाप्यावर दया कर.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खचित सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकून त्यास नितिमान ठरविले.परंतू त्याला धार्मिक पुढा-याची प्रार्थना आवडली नाही.देव प्रत्येक गर्विष्ठाला नीच करील, व जो स्वत:ला नम्र बनवितो त्याला देव उंचाविल.’’