unfoldingWord 21 - ‌‌‌देव मसिहा पाठवण्याचे अभिवचन देतो

unfoldingWord 21 - ‌‌‌देव मसिहा पाठवण्याचे अभिवचन देतो

உரையின் எண்: 1221

மொழி: Marathi

சபையினர்: General

செயல்நோக்கம்: Evangelism; Teaching

Features: Bible Stories; Paraphrase Scripture

நிலை: Approved

இந்த விரிவுரைக்குறிப்பு பிறமொழிகளின் மொழிபெயர்ப்பிற்கும் மற்றும் பதிவு செய்வதற்கும் அடிப்படை வழிகாட்டி ஆகும். பல்வேறு கலாச்சாரங்களுக்கும் மொழிகளுக்கும் பொருத்தமானதாக ஒவ்வொரு பகுதியும் ஏற்ற விதத்தில் இது பயன்படுத்தப்படவேண்டும்.சில விதிமுறைகளுக்கும் கோட்பாடுகளுக்கும் ஒரு விரிவான விளக்கம் தேவைப்படலாம் அல்லது வேறுபட்ட கலாச்சாரங்களில் இவை தவிர்க்கப்படலாம்.

உரையின் எழுத்து வடிவம்

‌‌‌आरंभापासूनच, देवाने मसिहाला पाठविण्याची योजना बनविली होती.‌‌‌मसिहा संबंधीचे अभिवचन सर्वप्रथम आदाम व हव्वा यांच्याकडे आले.‌‌‌देवाने वचन दिले की हव्वेला जे संतान होईल ते सापाचे डोके फोडील.‌‌‌ज्या सापाने हव्वेस फसविले तो सैतान होता.‌‌‌हया अभिवचनाचा अर्थ असा होता की मसिहा सैतानास पुर्णपणे पराजित करील.

‌‌‌देवाने अब्राहामास असे वचन दिले की त्याच्या द्वारे जगातील सर्व कुळे आशिर्वादीत होतील.‌‌‌पुढे भविष्यात मसिहा आल्यानंतर हया अभिवचनाची पुर्तता होणार होती.‌‌‌तो प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक गटाच्या लोकांचे तारण होणे शक्य करील.

‌‌‌देवाने मोशेस वचन दिले होते की भविष्यामध्ये तो मोशेसारखाच एक संदेष्टा तयार करील.‌‌‌हे मसिहाविषयीचे दुसरे अभिवचन होते. जे काही काळानंतर पूर्ण होणार होते.

‌‌‌देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील.‌‌‌त्याचा अर्थ असा होता की मसिहा हा दाविदाच्याच घराण्यात जन्मास येणार होता.

‌‌‌यिर्मया संदेष्टयाच्या द्वारे, देवाने वचन दिले की तो एक नवा करार करणार आहे, परंतु तो सिनाय पर्वतावर इस्राएलांबरोबर केलेल्या करारासारखा नसेल.‌‌‌नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या अपराधांची क्षमा करील.‌‌‌मसिहा या नव्या कराराचा आरंभ करील.

‌‌‌देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की मसिहा हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल.‌‌‌संदेष्टा हा एक असा माणूस असतो की जो देवाचा संदेश ऐकून तो लोकांना सांगतो.‌‌‌देवाने अभिवचन दिलेला मसिहा हा एक परिपूर्ण संदेष्टा असेल.

‌‌‌इस्राएली याजक लोकांनी केलेल्या पापाच्या शिक्षेचे प्रायश्चित म्हणून देवाला होमार्पणे करत असत.‌‌‌याजक लोकांसाठी देवाला प्रार्थनाही करत असत.‌‌‌मसिहा हा एक परिपूर्ण महायाजक असणार होता जो देवाला स्वत:चे परिपूर्ण बलिदान करणार होता.

‌‌‌राजा म्हणजे जो लोकांवर राज्य करतो व त्यांचा न्याय करतो.‌‌‌आपला पूर्वज दाविद याच्या सिंहासनावर बसणारा मसिहा हा एक परिपूर्ण राजा असेल.‌‌‌तो संपूर्ण जगावर सर्वकाळ राज्य करील, आणि प्रामाणिकपणे न्याय करील व योग्य निर्णय घेईल.

‌‌‌देवाच्या भविष्यवाद्यांनी मसिहाविषयी पुष्कळ इतर गोष्टी अगोदरच सांगून ठेवल्या होत्या. ‌‌‌मलाखी संदेष्टयाने भविष्य केले होते की मसिहा येण्याच्या अगोदर एक महान संदेष्टा येईल.‌‌‌यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.‌‌‌मीखा संदेष्टयाने सांगितले की मसिहा बेथलेहेम नगरामध्ये जन्मास येईल.

‌‌‌यशया संदेष्टा म्हणाला की मसिहा गालिलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.‌‌‌त्याने हेही सांगितले की मसिहा आजारी आंधळया, मुक्या, बहि-यांस व लंगडयांस बरे करील.

‌‌‌यशया संदेष्टयाने हेही भाकित केले की मसिहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल.‌‌‌इतर संदेष्टयांनी अगोदरच सांगून ठेवले की मसिहास मारणारे लोक त्याचे कपडे वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकतील आणि मसिहाचा एक मित्रच त्याचा विश्वासघात करिल.‌‌जख-या संदेष्टयाने अगोदरच सांगून ठेवले होते की मसिहाचा विश्वासघात करण्यासाठी त्याच्या मित्रास वेतन म्हणून चांदीची तीस नाणी दिली जातील.

‌‌‌संदेष्टयांनी मसिहा कशा प्रकारे मरेल याचेही भविष्य केले होते.‌‌‌यशयाने भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील.‌‌‌जरी त्याने काहीही वाईट केले नव्हते, तरी त्यास खिळे ठोकून भयंकर वेदनेचे पीडादायक मरण देतील.

‌‌‌संदेष्टयांनी हेही सांगितले की मसिहा परिपूर्ण व निष्पाप असेल.‌‌‌तो सर्व लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल.‌‌‌त्याला मिळालेली शिक्षा मुनष्य आणि परमेश्वर यांमध्ये समेट घडवून आणिल.‌‌‌हया कारणास्तव, मसिहास ठेचावे ही देवाची इच्छा होती.

‌‌‌संदेष्टयांनी भविष्य केले होते की मसिहा मरेल आणि देव त्याला पुन्हा जीवंतसुद्धा करील.‌‌‌मसिहाच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे देव आपली योजना पूर्ण करील, पाप्यांचे तारण करुन एक नवा करार प्रस्थापित करील.

‌‌‌देवाने संदेष्टयांना मसिहाविषयी अनेक गोष्टी प्रकट केल्या, परंतु त्या संदेष्टयांपैकी कोणाच्याही काळामध्ये मसिहा आला नाही.‌‌‌शेवटच्या भविष्यवाणीनंतर सुमारे 400 वर्षांनी अगदी योग्य वेळ आल्यानंतर देवाने मसिहास या जगामध्ये पाठविले.

தொடர்புடைய தகவல்கள்

ஜீவனுள்ள வார்த்தைகள் - இரட்சிப்பை பற்றியும் கிறிஸ்தவ ஜீவியத்தை பற்றியும் GRN ஆயிரக்கணக்கான மொழிகளில் வேதாகம செய்திகளை ஆடியோவில் சுவிஷேச செய்திகளாக கொண்டுள்ளது.

இலவச பதிவிறக்கங்கள் - இங்கே நீங்கள் GRN இன் முதன்மையான செய்தி உரைகளை பற்பலமொழிகளில், படங்கள் இன்னும் தொடர்புடைய உபகரணங்களையும் பதிவிறக்கம் செய்ய கிடைக்கிறது.

GRN இன் ஆடியோ நூலகம் - சுவிஷேஷத்திற்கும் வேதாகம அடிப்படை போதனைகளுக்கும் தேவையான உபகரணப் பொருட்கள் மக்களின் தேவைக்கும் கலாச்சாரத்திற்கும் பாணிகளுக்கும் ஏற்ற விதத்தில் பல்வேறு வடிவமைப்புகளில் அமைந்துள்ளது.

Choosing the audio or video format to download - What audio and video file formats are available from GRN, and which one is best to use?

Copyright and Licensing - GRN shares its audio, video and written scripts under Creative Commons