unfoldingWord 17 - ‌‌‌देवाचा दाविदाबरोबर करार

unfoldingWord 17 - ‌‌‌देवाचा दाविदाबरोबर करार

சுருக்கமான வருணனை: 1 Samuel 10; 15-19; 24; 31; 2 Samuel 5; 7; 11-12

உரையின் எண்: 1217

மொழி: Marathi

சபையினர்: General

பகுப்பு: Bible Stories & Teac

செயல்நோக்கம்: Evangelism; Teaching

வேதாகம மேற்கோள்: Paraphrase

நிலை: Approved

இந்த விரிவுரைக்குறிப்பு பிறமொழிகளின் மொழிபெயர்ப்பிற்கும் மற்றும் பதிவு செய்வதற்கும் அடிப்படை வழிகாட்டி ஆகும். பல்வேறு கலாச்சாரங்களுக்கும் மொழிகளுக்கும் பொருத்தமானதாக ஒவ்வொரு பகுதியும் ஏற்ற விதத்தில் இது பயன்படுத்தப்படவேண்டும்.சில விதிமுறைகளுக்கும் கோட்பாடுகளுக்கும் ஒரு விரிவான விளக்கம் தேவைப்படலாம் அல்லது வேறுபட்ட கலாச்சாரங்களில் இவை தவிர்க்கப்படலாம்.

உரையின் எழுத்து வடிவம்

‌‌‌शौल इस्त्रायलचा पहिला राजा होता.‌‌‌इस्राएल लोकांना पाहिजे तसाच तो सुंदर व ऊंच होता.‌‌‌इस्त्राएलावर काही वर्षे शौल राजाने चांगले राज्य केले.‌‌‌परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.

‌‌देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली तरुणांस राजा होण्यास निवडले.‌‌‌दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता.‌‌‌आपल्या पित्याची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरांवर हल्ला करणा-या सिंह व अस्वलास जीवे मारिले होते.‌‌‌दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.

‌‌‌दाविद एक महान योद्धा व पुढारी झाला.‌‌‌दाविद लहान असतानाच त्याने गल्याथ नावाच्या एका राक्षसी मुनष्याबरोबर युद्ध केले.‌‌‌गल्याथ हा एक प्रशिक्षित, बलाढय व तीन मीटर उंचीचा सैनिक होता!‌‌‌परंतू देवाने दाविदाचे सहाय्य केले व त्याच्याकरवी गल्याथाचा वध करुन इस्त्रायल लोकांस सोडविले.‌‌‌त्यानंतर दाविदाने इस्राएलाच्या शत्रूंवर अनेक विजय मिळविले त्यामुळे लोकांनी त्याची प्रशंसा केली.

‌‌‌लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूल शौलाला त्याचा हेवा वाटू लागला.‌‌‌शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले.‌‌‌एके दिवशी शौल दाविदास मारण्यासाठी शोधीत होता.‌‌‌दाविद लपून बसलेल्या गुहेमध्ये शौल गेला, परंतू शौलाला तो दिसला नाही.‌‌‌दाविद आता शौलाच्या अगदी जवळ होता व तो त्याला मारु शकत होता, पण त्याने तसे केले नाही.‌‌‌त्याऐवजी, दाविदाने शौलाच्या वस्त्राचा काठ कापला व सिद्ध केले की राजा बनण्यासाठी तो शौलाचा वध करणार नाही.

‌‌‌शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला.‌‌‌तो खूप चांगला राजा होता व लोक त्याजवर प्रेम करत.‌‌‌देवाने दाविदास आर्शिवादीत केले व तो यशस्वी झाला.‌‌‌दाविदाने अनेक युद्ध केले व देवाने त्यास इस्त्रायलांच्या शत्रूस पराजित करण्यास सहाय्य केले.‌‌‌दाविदाने यरुशलेम जिंकली व तिला आपली राजधानी बनविली.‌‌‌दाविदाच्या कारकीर्दीत इस्त्रायल सामर्थ्यवान व श्रीमंत राष्ट बनले.

‌‌‌दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होतो ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील.‌‌‌जवळजवळ 400 वर्षे लोक मोशेने बांधलेल्या दर्शन मंडपाच्या समोर देवाची उपासना करत व अर्पणे आणत.

‌‌‌परंतु देवाने नाथान संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’‌‌‌तूझा पुत्र ते मंदिर बांधील.‌‌‌परंतू मी तुला खूप आशीर्वादीत करीन.‌‌‌तुझ्याच वंशातील एक पुरुष माझ्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील!’’‌‌‌सर्वकाळ राज्य करणारा दाविदाच्या वंशातील एकमेव पुरुष म्हणजे मशिहा.’’‌‌‌मशिहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणारा होता.

‌‌‌दाविदाने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला व त्याची स्तूती केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व पुष्कळ आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते.‌‌‌देव हे कधी पूर्ण करील याविषयी दाविदास कल्पना नव्हती.‌‌‌परंतु मशिहा येण्याच्या अगोदर इस्त्रायली लोकांना जवळ जवळ 1000 वर्षे त्याची वाट पाहावी लागली.

‌‌‌दाविदाने न्यायाने व विश्वासूपणाने अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले.‌‌‌तथापी, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.

‌‌‌एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली.‌‌‌तिचे नाव बथशेबा होते.

‌‌‌दुसरीकडे बघण्याऐवजी, दाविदाने त्या स्त्रीस आपणाकडे आणावे म्हणुन कोणालातरी पाठवले.‌‌‌तो तिच्यापाशी निजला व तिला तिच्या घरी पाठवून दिले.‌‌‌काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.

‌‌‌बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता.‌‌‌दाविदाने उरीयास युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले.‌‌‌परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला.म्हणून ‌‌‌दाविदाने उरीयास परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे उरीया युद्धात मारला जाईल.

‌‌‌उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.‌‌‌नंतर तिने दाविदाच्या पुत्रास जन्म दिला.दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले.‌‌‌दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली.‌‌‌नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठिण प्रसंगी देखिल देवाच्या आज्ञा पाळल्या.

‌‌‌परंतु पापाची शिक्षा म्हणून दाविदाचा पुत्र मरण पावला.‌‌‌दाविदाच्या उरलेल्या जीवनात त्याच्या कुटुंबात नंतर भांडणे होत राहिली व त्याचे सामर्थ्यही खुप कमी झाले.‌‌‌जरी दाविद देवाशी अविश्वासू राहिला होता तरीही देव आपले वचन पाळण्यासाठी दाविदाशी विश्वासू राहिला.‌‌‌नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.

தொடர்புடைய தகவல்கள்

ஜீவனுள்ள வார்த்தைகள் - இரட்சிப்பை பற்றியும் கிறிஸ்தவ ஜீவியத்தை பற்றியும் GRN ஆயிரக்கணக்கான மொழிகளில் வேதாகம செய்திகளை ஆடியோவில் சுவிஷேச செய்திகளாக கொண்டுள்ளது.

இலவச பதிவிறக்கங்கள் - இங்கே நீங்கள் GRN இன் முதன்மையான செய்தி உரைகளை பற்பலமொழிகளில், படங்கள் இன்னும் தொடர்புடைய உபகரணங்களையும் பதிவிறக்கம் செய்ய கிடைக்கிறது.

GRN இன் ஆடியோ நூலகம் - சுவிஷேஷத்திற்கும் வேதாகம அடிப்படை போதனைகளுக்கும் தேவையான உபகரணப் பொருட்கள் மக்களின் தேவைக்கும் கலாச்சாரத்திற்கும் பாணிகளுக்கும் ஏற்ற விதத்தில் பல்வேறு வடிவமைப்புகளில் அமைந்துள்ளது.

Copyright and Licensing - GRN shares it's audio, video and written scripts under Creative Commons

Choosing the right audio or video format - What audio and video file formats are available from GRN, and which one is best to use?