unfoldingWord 22 - योहानाचा जन्म
சுருக்கமான வருணனை: Luke 1
உரையின் எண்: 1222
மொழி: Marathi
சபையினர்: General
செயல்நோக்கம்: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
நிலை: Approved
இந்த விரிவுரைக்குறிப்பு பிறமொழிகளின் மொழிபெயர்ப்பிற்கும் மற்றும் பதிவு செய்வதற்கும் அடிப்படை வழிகாட்டி ஆகும். பல்வேறு கலாச்சாரங்களுக்கும் மொழிகளுக்கும் பொருத்தமானதாக ஒவ்வொரு பகுதியும் ஏற்ற விதத்தில் இது பயன்படுத்தப்படவேண்டும்.சில விதிமுறைகளுக்கும் கோட்பாடுகளுக்கும் ஒரு விரிவான விளக்கம் தேவைப்படலாம் அல்லது வேறுபட்ட கலாச்சாரங்களில் இவை தவிர்க்கப்படலாம்.
உரையின் எழுத்து வடிவம்
पूर्वीच्या काळी, देव आपल्या लोकांशी देवदूत व संदेष्टयांद्वारे बोलला.परंतु त्यानंतर 400 वर्षे तो लोकांशी बोलला नाही.अचानक एके दिवशी जख-या नावाच्या एका वयोवृध्द याजकाकडे एक देवदूत एक संदेश घेऊन आला.जख-या व त्याची पत्नी, अलीशिबा, हे धार्मिक लोक होते, पण त्यांना मुलबाळ नव्हते.
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे.’’त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा.तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मसिहाच्या आगमनासाठी लोकांची तयारी करील !’’जख-याने उत्तर दिले,‘‘मी आणि माझी पत्नी आता खूप म्हातारे झालो आहोत आणि आता आम्हास मुले होऊ शकत नाहीत!हे घडेल हे कशावरुन मी समजू?’’
देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुला ही सुवार्ता सांगण्यासाठी देवाने मला पाठविले आहे.तू माझ्या वचनावर विश्वास ठेविला नाही, म्हणून बाळाचा जन्म होईपर्यंत तुला बोलता येणार नाही.लगेच, जख-या मुका झाला.तेंव्हा देवदूत जख-यास सोडून गेला.त्यानंतर जख-या घरी आला आणि त्याची पत्नी गर्भवती झाली.
जेव्हा अलीशिबा ही सहा महिन्यांची गरोदर होती, तेंव्हा तोच देवदूत अलिशिबाच्या नात्यातील मरीयेस अचानक प्रकट झाला.ती कुमारी होती व योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर तीचे वाग्दान झाले होते.देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल.तू त्याचे नाव येशू ठेव.तो परात्पर परमेश्वराचा पुत्र असून सर्वकाळ राज्य करिल.’’
मरीयाने उत्तर दिले,‘‘हे कसे होणार, मी तर कुमारी आहे?’’देवदूताने स्पष्ट केले,‘‘पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि देवाचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील.यास्तव ते बाळ पवित्र, देवाचा पुत्र असेल.’’देवदूताने सांगितलेल्या गोष्टीवर मरीयेने विश्वास ठेविला.
देवदूताच्या भेटीनंतर लगेच मरीया अलीशिबा हीस भेटण्यास गेली.मरीयेचे हे अभिवादन ऐकताच अलीशिबेच्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली.देवाने त्यांच्यासाठी जे काही केले होते त्याविषयी दोन्ही स्त्रियांनी एकत्र आनंद केला.अलीशिबेस भेटून तीन महिन्यानंतर मरीया आपल्या घरी परतली.
अलीशिबेने आपल्या पुत्रास जन्म दिल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या व अलीशिबेने त्याचे नाव योहान असे ठेविले.तेंव्हा देवाने जख-यास पुन्हा बोलण्याची अनुमति दिली.जख-या म्हणला,‘‘परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांचे स्मरण ठेविले आहे!तु, माझ्या पुत्रा, तु परात्पर देवाचा एक महान संदेष्टा होशिल जो आपल्या लोकांना त्यांच्या पापांची क्षमा कशी होईल हे सांगेल!’’