unfoldingWord 27 - चांगल्या शोमरोन्याची गोष्ट
Outline: Luke 10:25-37
Broj skripte: 1227
Jezik: Marathi
Publika: General
Žanr: Bible Stories & Teac
Svrha: Evangelism; Teaching
Bible Kuotation: Paraphrase
Status: Approved
Skripte su osnovne smernice za prevođenje i snimanje na druge jezike. Treba ih prilagoditi po potrebi kako bi bili razumljivi i relevantni za svaku različitu kulturu i jezik. Neki termini i koncepti koji se koriste možda će trebati dodatno objašnjenje ili čak biti zamenjeni ili potpuno izostavljeni.
Script Tekt
एके दिवशी, यहूदी धर्मशास्त्रात पारंगत असलेला एक व्यक्ति येशूची परिक्षा पाहण्यासाठी येऊन म्हणाला,‘‘गुरुजी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय करावे?’’येशूने उत्तर दिले,‘‘देवाच्या नियमशास्त्रामध्ये काय लिहिले आहे?’’
त्याने म्हटले,‘‘तू आपला देव याजवर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने व संपूर्ण शक्तिने प्रीती कर.आणि जशी आपणावर तशी शेजा-यावर प्रीति कर’’येशूने म्हटले,‘‘अगदी बरोबर उत्तर दिलेस!हे कर म्हणजे तू सर्वकाळ जगशील.’’
परंतु धर्मशास्त्राचा पंडित स्वत:ला धार्मीक ठरवू पाहात होता म्हणून त्याने विचारले,‘‘माझा शेजारी कोण आहे?’’
येशूने एक गोष्ट सांगून त्या धर्मशास्त्र पंडितास उत्तर दिले.‘‘एक यहुदी मनुष्य यरुशलेमेहून यरीहो नगरास रस्त्याने जात होता.’’
‘‘तो मनुष्य रस्त्याने जात असतांना, लुटारुंनी त्याच्यावर हल्ला केला.त्यांनी त्याकडे असलेली सर्व मालमत्ता घेऊन त्यास मारहाण करुन अर्धमेल्या अवस्थेत सोडून गेले.मग ते तेथून निघून गेले.
‘‘ त्यानंतर लगेच, एक यहूदी याजक त्याच रस्त्याने खाली चालत आला.जेंव्हा हया धार्मिक पुढा-याने पाहिले की हा मनुष्याला लुटारुंनी लुटले आहे, अर्धमेल्या अवस्थेत आहे, तो रस्त्याच्या दुस-या बाजुने गेला, त्याने मदतीची गरज असलेल्याकडे दुर्लक्ष केले व पुढे निघून गेला.
‘‘त्यानंतर थोड्या वेळातच, एक लेवी त्याच रस्त्याने आला.(लेवी हे यहूदी लोकांतील एक गोत्र होते जे मंदिराच्या सेवेमध्ये याजकांची मदत करत असत.)लेवीनेही त्या मनुष्याकडे, ज्याला लुटारुंनी लुटले होते मारले होते, दुर्लक्ष केले व दुस-या वाटेने निघून गेला.”
‘‘त्या मागून येणारा तिसरा व्यक्ति एक शोमरोनी होता.(शोमरोनी हे यहूदी वंशातील परराष्ट्रीयांशी विवाह केलेले लोक होते.)(शोमरोनी व यहूदी एकमेकांचा द्वेष करत असत.)परंतु हया शोमरोन्याने त्या यहूदी मनुष्यास पाहिले, तेंव्हा त्याला त्याची दया आली.मग त्याने त्याची काळजी घेतली व त्याच्या जखमांवर पट्टी बांधली”.
‘‘मग त्या शोमरोन्याने त्या मनुष्याला उचलून आपल्या गाढवावर बसविले व त्याने त्याला मार्गावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणिले व त्याची काळजी घेतली.”
‘‘दुस-या दिवशी, शोमरोन्याला पुढे प्रवासास जायचे होते.म्हणून त्याने उतारशाळेच्या व्यवस्थापकास काही पैसे देऊन म्हटले,‘‘याची काळजी घ्या, आणि यापेक्षा जे कांही अधिक पैसे खर्चाल तो खर्च मी परत आल्यावर तुम्हाला देईन.’’
तेंव्हा येशूने त्या धर्मशास्त्राच्या पंडितास विचारले,‘‘तूला काय वाटते?त्या तिघांपैकी लुटलेल्या मारलेल्या अवस्थेत असलेल्या मनुष्याचा शेजारी कोण होता?’’त्याने उत्तर दिले ज्याने त्याजवर दया दाखविली तो.येशूने त्यास म्हटले,‘‘तूही जाऊन तसेच कर.’’