unfoldingWord 25 - येशूची सैतानाकडून परिक्षा
ਰੂਪਰੇਖਾ: Matthew 4:1-11; Mark 1:12-13; Luke 4:1-13
ਸਕ੍ਰਿਪਟ ਨੰਬਰ: 1225
ਭਾਸ਼ਾ: Marathi
ਦਰਸ਼ਕ: General
ਮਕਸਦ: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
ਸਥਿਤੀ: Approved
ਲਿਪੀਆਂ ਦੂਜੀਆਂ ਭਾਸ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਅਨੁਵਾਦ ਅਤੇ ਰਿਕਾਰਡਿੰਗ ਲਈ ਬੁਨਿਆਦੀ ਦਿਸ਼ਾ-ਨਿਰਦੇਸ਼ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਹਰੇਕ ਵੱਖਰੇ ਸੱਭਿਆਚਾਰ ਅਤੇ ਭਾਸ਼ਾ ਲਈ ਸਮਝਣਯੋਗ ਅਤੇ ਢੁਕਵਾਂ ਬਣਾਉਣ ਲਈ ਲੋੜ ਅਨੁਸਾਰ ਢਾਲਿਆ ਜਾਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਵਰਤੇ ਗਏ ਕੁਝ ਨਿਯਮਾਂ ਅਤੇ ਸੰਕਲਪਾਂ ਲਈ ਵਧੇਰੇ ਵਿਆਖਿਆ ਦੀ ਲੋੜ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਜਾਂ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਬਦਲੀ ਜਾਂ ਛੱਡ ਦਿੱਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਸਕ੍ਰਿਪਟ ਟੈਕਸਟ
बाप्तिस्म्यानंतर लगेच पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले , त्या ठिकाणी येशू चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास करतो.तेव्हा सैतानाने तेथे येऊन येशूची परीक्षा पाहिली.
सैतानाने येशूला मोहात पाडले,‘‘जर तू खरोखर देवाचा पुत्र आहेस, तर हया दगडांस भाकरी होण्याची आज्ञा कर म्हणजे तूला जेवण मिळेल!’’
येशूने उत्तर दिले,‘‘देवाच्या वचनामध्ये असे लिहिले आहे,‘लोकांना जगण्यासाठी केवळ भाकरी नको, तर देवाच्या मुखातून निघणा-या प्रत्येक वचनाची गरज आहे!’’
मग सैतानाने येशूला घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले,‘‘तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असे लिहीले आहे की, ‘देव आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय धोंडयावर आपटू नये म्हणून ते तूला हातांवर झेलून धरतील.’’
परन्तु येशूने सैतानाला धर्मशास्त्रातूनच उत्तर दिले.तो म्हणला,‘‘देव आपल्या वचनातून आपल्या लोकांना आज्ञा देतो,‘तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नकोस.’’
मग सैतानाने येशूला जगातील सर्व राज्ये व वैभव दाखविले व म्हणाला,‘‘जर तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे तुला देईन.’’
येशूने म्हटले,‘‘अरे सैताना, चालता हो!देव आपल्या वचनामध्ये लोकांस आज्ञा करितो, परमेश्वर तुझा देव हयाला नमन कर व केवळ त्याचीच उपसना कर!’’
अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.मग देवदूतांनी येऊन येशूची सेवा केली.