unfoldingWord 18 - राज्याची विभागणी
ਰੂਪਰੇਖਾ: 1 Kings 1-6; 11-12
ਸਕ੍ਰਿਪਟ ਨੰਬਰ: 1218
ਭਾਸ਼ਾ: Marathi
ਦਰਸ਼ਕ: General
ਸ਼ੈਲੀ: Bible Stories & Teac
ਮਕਸਦ: Evangelism; Teaching
ਬਾਈਬਲ ਦੇ ਹਵਾਲੇ: Paraphrase
ਸਥਿਤੀ: Approved
ਲਿਪੀਆਂ ਦੂਜੀਆਂ ਭਾਸ਼ਾਵਾਂ ਵਿੱਚ ਅਨੁਵਾਦ ਅਤੇ ਰਿਕਾਰਡਿੰਗ ਲਈ ਬੁਨਿਆਦੀ ਦਿਸ਼ਾ-ਨਿਰਦੇਸ਼ ਹਨ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਹਰੇਕ ਵੱਖਰੇ ਸੱਭਿਆਚਾਰ ਅਤੇ ਭਾਸ਼ਾ ਲਈ ਸਮਝਣਯੋਗ ਅਤੇ ਢੁਕਵਾਂ ਬਣਾਉਣ ਲਈ ਲੋੜ ਅਨੁਸਾਰ ਢਾਲਿਆ ਜਾਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ। ਵਰਤੇ ਗਏ ਕੁਝ ਨਿਯਮਾਂ ਅਤੇ ਸੰਕਲਪਾਂ ਲਈ ਵਧੇਰੇ ਵਿਆਖਿਆ ਦੀ ਲੋੜ ਹੋ ਸਕਦੀ ਹੈ ਜਾਂ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਬਦਲੀ ਜਾਂ ਛੱਡ ਦਿੱਤੀ ਜਾ ਸਕਦੀ ਹੈ।
ਸਕ੍ਰਿਪਟ ਟੈਕਸਟ
ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला.देवाने शल्मोनास दर्शन दिले व त्यास सर्वात अधिक काय हवे आहे असे विचारले.जेंव्हा शल्मोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले.शल्मोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला.देवाने त्यास खूप श्रीमंतही बनविले.
आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले.लोक दर्शनमंडपासमोर उपासना न करता आता मंदिरामध्ये देवाची उपासना व अर्पण करु लागले.देव मंदिरात आला व त्याची उपस्थिती त्या मंदिरामध्ये होती, आणि देव आपल्या लोकांमध्ये वस्ती करु लागला.
परंतू शल्मोनाने परराष्ट्रीय स्त्रीयांवर प्रेम केले.त्याने अनेक स्त्रीयांशी विवाह करुन देवाची आज्ञा मोडिली. त्याने 1000 स्त्रीयांशी विवाह केला!त्यापैकी अनेक स्त्रीया परराष्ट्रीय होत्या त्यांनी आपली दैवते बरोबर आणिली व त्यांची पूजा करणे चालू ठेवले.शल्मोन वृद्ध झाल्यानंतर त्यानेही त्यांच्या दैवतांची पूजा केली.
देव शल्मोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलाच्या राज्याचे दोन भाग केले.
शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र रहोबाम हा राजा झाला.रहोबाम हा मूर्ख मनुष्य होता.इस्त्रायल राष्ट्रातील सर्व लोक त्याला राजा म्हणून मान्यता देऊन त्याचा राज्याभिषेक करण्यास एकत्र आले.त्यांनी रहोबामाकडे तक्रार केली की, शल्मोनाने त्यांना खूप परिश्रम करण्यास भाग पाडले व जास्त प्रमाणात कर वसूल केला.
रहोबामाने मूर्खपणाने उत्तर दिले,‘‘तुम्हांस वाटले असेल की माझा पिता शल्मोन हयाने तुमच्याकडून परिश्रम करुन घेतले, परंतु मी तर त्याहीपेक्षा अधिक परिश्रम तुमच्याकडून करुन घेईन व तुमच्याशी क्रूरतेने वागेन.’’
इस्त्राएल राष्ट्राच्या दहा गोत्रांनी एकत्र येऊन रहोबामाविरुद्ध बंड पुकारले.केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली.ही दोन गोत्रे मिळून यहूदाचे राज्य झाले.
इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले.त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.
यराबामाने देवाविरुध्द बंड पुकारले व लोकांना पापात पाडिले.यहूदाच्या राज्यामध्ये असलेल्या देवाच्या मंदिरात उपासना न करता त्याने आपल्या लोकांसाठी दोन मूर्ति स्थापन केल्या व त्यांची पूजा करु लागल्या.
यहूदाचे राज्य व इस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.
इस्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते.त्यांपैकी बहुतेक राजांचा वध अन्य इस्त्राएल लोकांनीच केला जे त्यांच्या जागी राज्य करु पाहात होते.
सर्व राजे व इस्त्रायलाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजा मूर्तीची पूजा करु लागले.त्यांच्या हया मूर्तिपूजेमध्ये बहुधा व्यभिचार व नरबली (बालकांचे अर्पण) यांचा समावेश होता.
यहूदाचे राजे हे दाविदाच्या वंशातील होते.त्यांपैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले व ख-या देवाची उपासना केली.परंतु यहूदाच्या राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली.त्यापैकी काही राजांनी तर स्वत:च्या मुलांचेही अर्पण खोटया देवांसाठी केले.यहूदाच्या राज्यातील बहुसंख्य प्रजेने ही देवाविरुध्द बंड करुन अन्य दैवतांची पूजा केली.