unfoldingWord 44 - पेत्र व योहान एका भिका-यास बरे करतात

रूपरेखा: Acts 3-4:22
लिपि नम्बर: 1244
भाषा: Marathi
दर्शक: General
उद्देश्य: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
स्थिति: Approved
लिपिहरू अन्य भाषाहरूमा अनुवाद र रेकर्डिङका लागि आधारभूत दिशानिर्देशहरू हुन्। तिनीहरूलाई प्रत्येक फरक संस्कृति र भाषाको लागि बुझ्न योग्य र सान्दर्भिक बनाउन आवश्यक रूपमा अनुकूलित हुनुपर्छ। प्रयोग गरिएका केही सर्तहरू र अवधारणाहरूलाई थप व्याख्याको आवश्यकता हुन सक्छ वा पूर्ण रूपमा प्रतिस्थापन वा मेटाउन पनि सकिन्छ।
लिपि पाठ

एके दिवशी पेत्र व योहान मंदिरामध्ये जात होते.ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ जात असतांना, त्यांनी एक लंगडा भिकारी भीक मागत असतांना पाहिला.

पेत्राने त्या पांगळ्या मनुष्याकडे पाहून म्हटले, "तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत.पण माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो.येशूच्या नावामध्ये ऊठ आणि चालू लाग!"

लगेच तो पांगळा मनुष्य बरा झाला, तो चालू लागला व तो उड्या मारत देवाची स्तुती करू लागला.मंदिराच्या अंगणातील लोकांनी त्याला पाहून आश्चर्य केले.

त्या ब-या झालेल्या मनुष्यास पाहण्यासाठी लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली.पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य बरा झालेला पाहून तुम्ही का आश्चर्य करता?"आम्ही आमच्या सामर्थ्याने किंवा आमच्या चांगुलपणाने त्यास बरे केले नाही.तर येशूच्या शक्तीने व देवाने दिलेल्या विश्वासाद्वारेच हा मनुष्य बरा झाला आहे."

"तुम्ही रोमी सम्राटास येशूला जीवे मारावयास सांगितले.तुम्ही जीवनदात्यास ठार मारिले, परंतु देवाने त्यास मेलेल्यांतून पुन्हा उठविले.जरी तुम्ही काय करत होता ते तुम्हास कळले नाही, तरी देवाने तुमच्या करवी मसिहा दुःख सोशिल व मरेल ही भविष्यवाणी पूर्ण करून घेतली आहे.यास्तव, आता पश्चाताप करा व देवाकडे वळा म्हणजे तुमची पापे धुतली जातील."

मंदिरातील पुढारी पेत्र व योहान यांचे बोलणे ऐकून संतापले.म्हणून त्यांनी त्यांस धरून तुरुंगात टाकले.परंतु पुष्कळ लोकांनी पेत्राच्या वचनावर विश्वास ठेविला, आणि आता विश्वासणा-यांची संख्या वाढून सुमारे 5000 झाली होती.

दुस-या दिवशी, यहूदी पुढा-यांनी पेत्र व योहान यांना महायाजकासमोर व इतर धर्मपुढा-यांसमोर उभे केले.त्यांनी पेत्र व योहान यांना विचारले, "तुम्ही कोणत्या शक्तिद्वारे ह्या पांगळ्या मनुष्यास बरे केले?"

पेत्र त्यांना म्हणाला, "हा मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरा होऊन तुम्हापुढे उभा आहे.तुम्ही येशूला खिळले, परंतु देवाने त्यास पुन्हा जिवंत केले!तुम्ही त्यास नाकारले, परंतु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याशिवाय तारणाचा दुसरा मार्ग नाही!"

हे ऐकून धार्मिक पुढा-यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण पेत्र व योहान सामान्य व अडाणी माणसे असतांनाही त्यांच्यासमोर मोठ्या धाडसाने बोलत होते.परंतु ते येशूच्या सहवासात होते हे त्यांनी ओळखले.मग त्यांनी पेत्राला व योहानाला धमकावले व जाऊ दिले.