unfoldingWord 30 - येशू पाच हजारांना भोजन देतो

रूपरेखा: Matthew 14:13-21; Mark 6:31-44; Luke 9:10-17; John 6:5-15
लिपि नम्बर: 1230
भाषा: Marathi
दर्शक: General
उद्देश्य: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
स्थिति: Approved
लिपिहरू अन्य भाषाहरूमा अनुवाद र रेकर्डिङका लागि आधारभूत दिशानिर्देशहरू हुन्। तिनीहरूलाई प्रत्येक फरक संस्कृति र भाषाको लागि बुझ्न योग्य र सान्दर्भिक बनाउन आवश्यक रूपमा अनुकूलित हुनुपर्छ। प्रयोग गरिएका केही सर्तहरू र अवधारणाहरूलाई थप व्याख्याको आवश्यकता हुन सक्छ वा पूर्ण रूपमा प्रतिस्थापन वा मेटाउन पनि सकिन्छ।
लिपि पाठ

येशूने आपल्या प्रेषितांना अनेक गावांतुन लोकांना सुवार्ता सांगण्यास व शिक्षण देण्यासाठी पाठविले.जेंव्हा ते येशूकडे पुन्हा आले, तेंव्हा त्यांनी आपण केलेली सर्व कार्ये येशूला सांगितली.तेंव्हा येशूने त्यांना तळ्याच्या पलिकडे शांत ठिकाणी काही वेळ विश्रांती घेण्यासाठी त्याच्याबरोबर बोलाविले.म्हणून ते तारवामध्ये बसले व तळयाच्या पलिकडे पोहोचले.

परंतु त्या ठिकाणी पुष्कळ लोक होते त्यांनी येशू व शिष्यांना तारवात बसुन जातांना पाहीले.हा जनसमुदाय त्यांच्या अगोदर तळयाच्या पलिकडे पोहचण्यासाठी तळ्याच्या काठाने धावला.म्हणुन येशू व शिष्य त्या ठिकाणी पोहोचले,तेंव्हा एक मोठा जनसमुदाय त्यांची प्रतिक्षा करत तेथे थांबला होता.

त्या जनसमुदायामध्ये सुमारे 5000 पुरुष होते, तरी स्त्रिया व मुले मोजली नव्हती.येशूला त्यांचा कळवळा आला.येशूला, हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा दिसून आला.तेंव्हा तो त्यांना शिकवू लागला व त्यामधील आजारी लोकांस बरे करू लागला.

दुपारी उशीराने, शिष्यांनी येशूकडे जाऊन सांगितले, ‘‘खूप उशीर झाला आहे आणि येथे जवळपास गाव नाही.तेंव्हा आपण लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आपणांसाठी कांही खायला घेतील.’’

परंतू येशूने शिष्यांस म्हटले, ‘‘तूम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या!’’ते उत्तरले, ‘‘आम्ही कसे काय एवढया मोठया समुदायास जेवण देऊ शकतो?’’आम्हाकडे केवळ पाच भाकरी व दोन मासळी आहेत.’’

येशूने शिष्यांस सांगितले की, त्यांनी लोकांस हिरवळीवर पन्नास पन्नासाच्या पंक्ति करुन बसायला सांगावे.

मग येशूने त्या पाच भाकरी व दोन मासळी घेऊन वरती आकाशाकडे पहिले व त्या अन्नाबद्दल देवाचा धन्यवाद केला.

मग येशूने त्या भाकरी व मासळीचे तुकडे केले.मग त्याने शिष्यांस लोकांना वाढण्यासाठी दिले.शिष्य लोकांना वाढतच राहीले तरी ते अन्न संपले नाही.सर्व लोक जेवून तृप्त झाले.

त्यानंतर, शिष्यांनी उरलेल्या भाकरी व मासळीचे तुकडे गोळा केले व ते बारा टोपल्या भरल्या.हे सर्व भोजन केवळ पाच भाकरी व दोन मासळयांतूनच पुरविले गेले.