unfoldingWord 24 - योहान येशूचा बाप्तिस्मा करतो
रुपरेषा: Matthew 3; Mark 1; Luke 3; John 1:15-37
स्क्रिप्ट क्रमांक: 1224
इंग्रजी: Marathi
प्रेक्षक: General
उद्देश: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
स्थिती: Approved
स्क्रिप्ट हे इतर भाषांमध्ये भाषांतर आणि रेकॉर्डिंगसाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रत्येक भिन्न संस्कृती आणि भाषेसाठी त्यांना समजण्यायोग्य आणि संबंधित बनविण्यासाठी ते आवश्यकतेनुसार स्वीकारले जावे. वापरलेल्या काही संज्ञा आणि संकल्पनांना अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता असू शकते किंवा अगदी बदलली किंवा पूर्णपणे वगळली जाऊ शकते.
स्क्रिप्ट मजकूर
योहान, जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र, मोठा होऊन एक संदेष्टा बनतो.तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या केसापासून बनविलेली होती.
योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले.त्याने त्यांस प्रचार केला,‘‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!’’
योहानाचा संदेश ऐकून अनेक लोकांनी पश्चाताप केला आणि योहानाने त्यांना बाप्तिस्मा दिला.अनेक धार्मिक पुढारी देखील बाप्तिस्मा घेण्यासाठी आले, परंन्तु त्यांनी आपल्या पापांविषयी पश्चात्ताप केला नव्हता व आपले पाप कबूल केले नव्हते.
योहान त्या धार्मिक पुढा-यांना म्हणाला,‘‘ तुम्ही सापांनो पिल्लांनो!पश्चात्ताप करा आणि तुमची वागणूक बदला.प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही, ते तोडले जाईल व अग्निमध्ये टाकण्यात येईल.योहानाने संदेष्टयांच्या या वचनाची पूर्तता केली, ‘‘पाहा, मी आपला दूत तुझ्या पुढे पाठवित आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील.’’
काही यहूद्यांनी योहानाला तु मसिहा आहे की काय असे विचारले.योहान म्हणला,‘‘मी मसिहा नाही, परंतू माझ्या मागून एकजण येत आहे.तो एवढा महान आहे की, त्याच्या वहाणांचा बंद सोडण्याची देखील माझी पात्रता नाही.’’
दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला.योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा!जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.’’
योहान येशूला म्हणाला, ‘‘मी तुला बाप्तिस्मा देण्यास पात्र नाही.त्याऐवजी मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची आवश्यकता आहे.परंतू येशू त्यास म्हणाला,‘‘तु मला बाप्तिस्मा दे, कारण देवाच्या दृष्टिने हे करणे योग्य आहे.’’तेंव्हा योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते.
जेव्हा येशू बाप्तिस्म्यानंतर पाण्यातून वर आला, तेंव्हा देवाचा आत्मा कबूतराच्या रुपामध्ये येऊन त्याच्यावर थांबला.त्याचवेळी आकाशवाणी झाली,‘‘तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तुज विषयी मी फार संतुष्ट आहे.’’
देवाने योहानास सांगितले होते, ‘‘तू बाप्तिस्मा दिलेल्या ज्या व्यक्तिवर पवित्र आत्मा उतरुन येईल.तीच व्यक्ति देवाचा पुत्र असेल’’एकच देव आहे.परंतु जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेंव्हा त्याने देवपिता बोलत असलेला पाहिला, देवपुत्र येशू पाहिला, आणि पवित्र आत्मा पाहिला.