unfoldingWord 48 - येशू हा अभिवचनानुसार दिलेला मसिहा आहे
개요: Genesis 1-3, 6, 14, 22; Exodus 12, 20; 2 Samuel 7; Hebrews 3:1-6, 4:14-5:10, 7:1-8:13, 9:11-10:18; Revelation 21
스크립트 번호: 1248
언어: Marathi
청중: General
목적: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
지위: Approved
이 스크립트는 다른 언어로 번역 및 녹음을위한 기본 지침입니다. 그것은 그것이 사용되는 각 영역에 맞게 다른 문화와 언어로 조정되어야 합니다. 사용되는 몇 가지 용어와 개념은 다른 문화에서는 다듬어지거나 생략해야 할 수도 있습니다.
스크립트 텍스트
देवाने जेव्हा सृष्टी बनविली तेव्हा सर्वकाही परिपूर्ण होते.तेथे पाप नव्हते.आदाम आणि हव्वा एकमेकांवर प्रेम करत व त्यांचे देवावर प्रेम होते.तेथे कुठल्याही प्रकारचा आजार किंवा मृत्यु नव्हतासृष्टी अशीच राहावी अशी देवाची इच्छा होती.
हव्वेला फसविण्यासाठी सैतानाने सर्पाद्वारे संभाषण केले.तेव्हा तिने व आदामाने देवाविरूद्ध पाप केले.त्यांनी केलेल्या पापाचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील प्रत्येकजण आजारी पडतो व मरण पावतो.
आदाम आणि हव्वेने पाप केल्यामुळे आणखी एक भयानक गोष्ट घडली.ते देवाचे वैरी झाले.परिणामतः तेव्हापासून पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ति पापाचा स्वभाव घेऊन जन्मतो व तो देवाचा शत्रु देखिल होतो.पापामुळे देव आणि मनुष्यांमध्ये असणारा नातेसंबंध तुटला.परंतु हा नातेसंबंध पुन्हा जोडण्याची देवाने एक योजना बनविली.
देवाने अभिवचन दिले की हव्वेचा एक वंशज सैतानाचे डोके फोडिल व सैतान त्याची टाच फोडिल.अर्थात सैतान मसिहास जीवे मारील, परंतु देव त्यास पुन्हा जिवंत करील आणि मग मसिहा सैतानाच्या सत्तेचा संपूर्ण नायनाट करील.अनेक वर्षांनंतर देवाने येशू हाच मसिहा आहे हे प्रकट केले.
जेव्हा देवाने संपुर्ण पृथ्वी जलप्रलयाद्वारे नष्ट केली, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवणा-यांसाठी देवाने एक जहाज दिले.त्याचप्रकारे, मनुष्यांच्या पापांमुळे प्रत्येक जण मृत्युस पात्र आहे, पण त्याजवर विश्वास ठेवणारांस वाचविण्यासाठी (तारण्यासाठी) देवाने येशूला पाठविले.
शेकडो वर्षे, महायाजक मनुष्यांना आपल्या पापांची शिक्षा मरण आहे हे दर्शविण्यासाठी सारखे पशुबली व होमार्पणे करत.परंतु त्या अर्पणांद्वारे त्यांच्या पापांची क्षमा होऊ शकली नाही.येशू हा एक थोर महायाजक आहे.इतर याजकांनी केले नाही असे येशूने केले, संपूर्ण जगातील लोकांसाठी स्वतःचेच अर्पण केले, अशासाठी की जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना पापांची क्षमा व्हावी.येशू हा एक परिपूर्ण महायाजक होता, कारण त्याने, प्रत्येकाने केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा स्वत:वर घेतली.
देवाने अब्राहामास म्हटले, "सर्व राष्ट्रांतील कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादीत होतील."येशू ख्रिस्त हा अब्राहामाचा वंशज होता.
जगातील सर्व कुळे त्याच्याद्वारे आशीर्वादीत झाली, कारण जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते व तो अब्राहामाचा आत्मिक वंशज होतो.जेव्हा देवाने अब्राहामास इसहाकाचे अर्पण करावयास सांगितले, तेंव्हा देवाने इसहाकाच्या ऐवजी, अर्पणासाठी कोकरा पुरविला होता.आम्ही आमच्या पापांमुळे मरणदंडास पात्र आहोत!परंतु देवाने येशूला, देवाचा कोकरा, अर्पण म्हणून आमच्याजागी मरण्यास पाठविले.
जेव्हा देवाने मिसर देशामध्ये शेवटची पीडा पाठविली, तेव्हा त्याने प्रत्येक इस्राएली कुटुंबास एक निर्दोष कोकऱ्याचा वध करून त्याचे रक्त त्यांच्या घरांच्या चौकटीस लावावयास सांगितले होते.जेव्हा देवाने ते रक्त पाहिले, तेव्हा त्यांचे घर ओलांडून तो गेला व प्रथम जन्मलेल्या पुत्रांस त्याने मारले नाही.ह्या घटनेस वल्हांडण म्हणतात.
येशू ख्रिस्त हाच आमच्या वल्हांडणाचा कोकरा आहे.तो परिपुर्ण व निर्दोष होता आणि वल्हांडणाच्या सणाच्या समयी वधला गेला होता.जेव्हा कोणी येशूवर विश्वास ठेवितो, तेव्हा येशूच्या रक्ताद्वारे त्याच्या पापांची खंडणी भरून देण्यात येते, आणि देवाची शिक्षा त्या व्यक्तीस ओलांडून जाते.
देवाने इस्राएलाबरोबर एक करार केला होता, ते त्याचे निवडलेले लोक होते.पण त्याने आता सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक नवा करार केला.ह्या नव्या करारामुळे, कोणत्याही लोकसमुदायातील कोणीही येशूवरील विश्वासाद्वारे देवाची मुले होऊ शकतात.
देवाच्या वचनाचा प्रचार करणारा मोशे हा एक महान संदेष्टा होता.परंतु येशू त्या सर्वांहून अधिक महान संदेष्टा आहे.तो देव आहे, म्हणून त्याने जे काही केले व बोलले ती देवाची कृत्ये व देवाचे शब्द होते.म्हणूनच येशूला देवाचा शब्द असे म्हणतात.
देवाने दाविद राजाला अभिवचन दिले होते की त्याच्या वंशजांपैकीच एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील.येशू हा देवाचा पुत्र व मसिहा असल्यामुळे देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करणारा तो दाविदाचा एक विशेष वंशज आहे.
दाविद हा इस्राएलाचा राजा होता, परंतु येशू हा संपुर्ण विश्वाचा राजा आहे!तो पुन्हा येणार आहे व आपल्या राज्यामध्ये न्यायाने व शांतीने सर्वकाळ राज्य करणार आहे.