unfoldingWord 02 - पापाचा जगामध्ये प्रवेश
מתווה: Genesis 3
מספר תסריט: 1202
שפה: Marathi
נושא: Sin and Satan (Sin, disobedience, Punishment for guilt)
קהל: General
מַטָרָה: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
סטָטוּס: Approved
סקריפטים הם קווים מנחים בסיסיים לתרגום והקלטה לשפות אחרות. יש להתאים אותם לפי הצורך כדי להפוך אותם למובנים ורלוונטיים לכל תרבות ושפה אחרת. מונחים ומושגים מסוימים שבהם נעשה שימוש עשויים להזדקק להסבר נוסף או אפילו להחלפה או להשמיט לחלוטין.
טקסט תסריט
देवाने बनविलेल्या सुंदर बागेमध्ये आदाम व त्याची बायको ही दोघे खूप आनंदीत होते. ती दोघेही नग्न होती, पण त्यांना संकोच वाटत नव्हता, कारण त्यावेळी जगामध्ये पाप नव्हते. ती दोघे नेहमी बागेमध्ये देवाबरोबर फिरत असत व देवाशी बोलत असत.
परंतु त्या बागेमध्ये एक धूर्त साप होता. तो स्त्रीस म्हणाला, “काय तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय ?
स्त्रीने उत्तर दिले, “बागेतील कुठल्याही झाडाचे फळ खाण्याची आम्हाला मोकळीक आहे फक्त बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणारे फळ खाण्यास मनाई आहे.देव बोलला, ‘जर तुम्ही खाल किंवा त्यास स्पर्शही कराल, तर मराल.”
सापाने स्त्रीस म्हटले, “हे खोटे आहे ! तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला ठाऊक आहे की हे फळ खाल्ल्यानंतर, तुम्हास त्याच्या प्रमाणेच बऱ्यावाईटाचे ज्ञान होईल.”
स्त्रीने पाहिले की ते फळ खायला चांगले व दिसायला मनोहर आहे. तिला शहाणेसुदधा व्हायचे होते, म्हणुन तिने कांही फळे घेतली व खाल्ली. मग तिने आपल्या नवऱ्यास कांही दिली, तो तिच्याजवळ होता, व त्याने सुदधा ती खाल्ली.
अचानक, त्यांचे डोळे उघडले व ते नग्न आहेत ते त्यांना कळले. मग त्यांनी झाडाची पाने शिवून आपणाला झाकण्यासाठी कटिवेष्टने(कपडे) तयार केली.
मग आदाम व त्याची बायको यांनी देवबाप बागेत आल्याचा आवाज ऐकला.ती दोघेही देवापासून लपलीमग देव आदामास म्हणाला, “तु कोठे आहेस ? आदामाने उत्तर दिले, “बागेत चालण्याचा तुझा आवाज ऐकला, व मी घाबरलो, कारण मी नग्न आहे. म्हणून मी लपलो.”
मग देवाने विचारले,” तु नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? “मी मना केलेले फळ तू खाल्ले आहेस काय ? आदामाने उत्तर दिले, “तू मला ही स्त्री दिली, आणि तिने हे फळ मला दिले. मग देव स्त्रीस बोलला, “तू हे काय केलेसे ? स्त्रीने उत्तर दिले, ” सापाने मला फसविले.”
देव सर्पास बोलला, “तू शापीत झाला आहेस ! तू आपल्या पोटाने चालशील आणि माती खाशीलतू व स्त्री यामध्ये वैर स्थापीत करीन व तुइया व स्त्रीच्या संततीमध्येही मी वैर स्थापीत करीन. स्त्रीचे संतान तुझे डोके ठेचील व तु त्याची टाच फोडशिल.”
मग देव स्त्रीस बोलला, “तु मोठया कष्टाने मुले प्रसवशील असे मी करीन. तरीही तुझी ओढ, तुझ्या नवऱ्याकडे राहील, व तो तुझ्यावर स्वामित्व चालविल.”
देव मनुष्यास म्हणाला, “ तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस व माझी आज्ञा मोडलीसम्हणून जमिन शापित झाली आहे, आता तूला कष्ट करुनच अन्न मिळेल तू मरशील, आणि तुझे शरीर मातीस मिळेल.” आदामाने त्याच्या बायकोस हव्वा हे नाव दिले याचा अर्थ “जन्मदात्री कारण तिच्याद्वारेच सर्व माणसे जन्मास आली. मग देवाने आदाम व हव्वा यांना चर्मवस्त्रे करुन घातली.
मग देव बोलला, “आता मनुष्यप्राणी आपणासारखाच झाला आहे. त्याला बऱ्यावाईटाचे ज्ञान झालेले आहे, त्यांना जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ देऊन सर्वकाळ जगू देऊ नये.” म्हणून देवाने आदाम व हव्वा यांना सुंदर बागेतून घालवून दिले. देवाने त्या बागेभोवती सामर्थ्यशाली देवदूतांचा पहारा ठेवला, की कोणी त्या झाडाचे फळ खाऊ नये.