unfoldingWord 07 - देव याकोबास आशीर्वाद देतो
מתווה: Genesis 25:27-35:29
מספר תסריט: 1207
שפה: Marathi
קהל: General
מַטָרָה: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
סטָטוּס: Approved
סקריפטים הם קווים מנחים בסיסיים לתרגום והקלטה לשפות אחרות. יש להתאים אותם לפי הצורך כדי להפוך אותם למובנים ורלוונטיים לכל תרבות ושפה אחרת. מונחים ומושגים מסוימים שבהם נעשה שימוש עשויים להזדקק להסבר נוסף או אפילו להחלפה או להשמיט לחלוטין.
טקסט תסריט
ही मुले वाढत असतांना, याकोबाला घरीच राहायला आवडत असे, परंतु एसावाला शिकार करायला आवडत असे.याकोब रिबकेचा आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.
एके दिवशी, एसाव शिकारीहून आला असता, त्याला खूप भूक लागली होती.एसाव याकोबास म्हणाला, "तू बनवलेल्या जेवणातून मला काही दे."याकोबाने उत्तर दिले, "पहिल्याने, तू मोठा मुलगा म्हणून तुझे जे हक्क आहेत ते हक्क मला दे."अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला ज्येष्ठत्वाचा (मोठ्या मुलाचा) हक्क देऊन टाकला.मग याकोबाने त्याला काही अन्न दिले.
इसहाक आपला आशीर्वाद एसावास देऊ इच्छित होता.परंतु असे करण्यापूर्वी रिबका आणि याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असल्याचे ढोंग करून इसहाकास फसविले.इसहाक म्हातारा झाल्यामुळे त्याला दिसत नव्हते.याकोबाने एसावाचे कपडे घातले आणि आपल्या मानेवर व हातांवर शेळीची कातडी घातली.
याकोब इसहाकाकडे येऊन म्हणाला, "मी एसाव आहे.तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणुन मी तुम्हाकडे आलो आहे.”जेंव्हा इसहाकाने शेळीच्या केसास स्पर्श केला व त्याच्या कपड्यांचा वास घेतला, तेंव्हा तो एसावच आहे असे वाटून त्याने त्यास आशीर्वाद दिला.
एसाव याकोबाचा द्वेष करू लागला कारण याकोबाने त्याचा जेष्ठत्वाचा अधिकार आणि आशीर्वाद सुदधा चोरला होता.म्हणून आपला बाप वारल्यानंतर त्याने याकोबास ठार मारण्याची योजना आखली.
परंतु रिबकेने एसावच्या योजनेबद्दल ऐकले.म्हणून तिने आणि इसहाकाने याकोबास आपल्या दूर देशी असलेल्या नातेवाईकाकडे राहाण्यास पाठवले.
याकोब बरीच वर्षे रिबकेच्या नातेवाईकांबरोबर राहिला.या कालावधीमध्ये त्याने लग्न केले व त्यास बारा पुत्र व एक कन्या झाली.परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.
त्यानंतर वीस वर्षांनी कनानामध्ये असणा-या आपल्या घरी, याकोब आपला परिवार, नोकर-चाकर व गुराढोरांच्या कळपासह परतला.
याकोब खूप घाबरत होता कारण त्याला वाटले की त्याचा भाऊ एसाव अजूनही त्यास मारण्यासाठी टपला असेल.म्हणून त्याने आपल्या जनावरांचे अनेक कळप एसावाकडे भेट म्हणून पाठविले.ज्या सेवकांनी ते कळप एसावाकडे नेले ते त्यास म्हणाले, "आपला दास याकोब आपणासाठी हे कळप भेट म्हणून देत आहे.तो लवकरच येत आहे."
परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.मग याकोब सुखाने कनानामध्ये राहू लागला.मग इसहाक मरण पावला, आणि याकोब व एसावाने त्यास पुरले.देवाने अब्राहामाशी केलेल्या कराराचे अभिवचन आता इसहाकाकडून याकोबाकडे सुपूर्त करण्यात आले.