unfoldingWord 31 - येशू पाण्यावर चालतो

રૂપરેખા: Matthew 14:22-33; Mark 6:45-52; John 6:16-21
સ્ક્રિપ્ટ નંબર: 1231
ભાષા: Marathi
પ્રેક્ષકો: General
હેતુ: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
સ્થિતિ: Approved
સ્ક્રિપ્ટો અન્ય ભાષાઓમાં અનુવાદ અને રેકોર્ડિંગ માટે મૂળભૂત માર્ગદર્શિકા છે. દરેક અલગ-અલગ સંસ્કૃતિ અને ભાષા માટે તેમને સમજી શકાય તેવું અને સુસંગત બનાવવા માટે તેઓને જરૂરી અનુકૂલિત કરવા જોઈએ. ઉપયોગમાં લેવાતા કેટલાક શબ્દો અને વિભાવનાઓને વધુ સમજૂતીની જરૂર પડી શકે છે અથવા તો બદલી અથવા સંપૂર્ણપણે છોડી દેવામાં આવી શકે છે.
સ્ક્રિપ્ટ ટેક્સ્ટ

तेंव्हा लोकांना घरी पाठवून देत असतांना येशूने शिष्यांना नावेमध्ये बसून समुद्राच्या पलीकडे जाण्यास सांगितले.सर्व लोक निघून गेल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थनेसाठी गेला.येशू तेथे एकटाच होता, आणि रात्री खुप उशिरापर्यंत तो प्रार्थना करीत राहीला.

तोपर्यंत, शिष्य नाव वल्हवत राहीले, पण बरीच रात्र झाली तरी ते समुद्राच्या मध्यभागापर्यंतच पोहोचले होते.फार कष्टाने ते नाव वल्हवीत होते कारण जोराचा वारा त्यांच्या विरुद्ध वाहात होता.

तेंव्हा येशू प्रार्थना संपवून शिष्यांकडे आला.तो समुद्रावरुन पाण्यावर चालत त्यांच्या नावेकडे येत होता!

येशूला पाहून शिष्य खूप घाबरले, कारण त्यांना वाटले की ते कोणा भुताला पाहात आहेत. येशूला ठाऊक होते की, ते घाबरले आहेत म्हणून तो त्यांना म्हणाला, ‘‘भिऊ नका.मीच आहे!’’

तेंव्हा पेत्र येशूला म्हणला, ‘‘प्रभुजी, जर आपण आहात, तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या.’’येशूने पेत्रास म्हटले, ‘‘ये!’’

म्हणून पेत्र नावेतून उतरुन येशूकडे पाण्यावर चालू लागला.परंतू थोडे अंतर चालल्यानंतर, त्याने आपली दृष्टि येशूवरुन काढली आणि तो लाटांकडे व वा-याकडे पाहू लागला.

तेंव्हा पेत्राला भिती वाटली व तो पाण्यामध्ये बुडू लागला.तो मोठयाने ओरडला, ‘‘प्रभुजी, मला वाचवा!’’येशू लगेच त्याच्यापर्यंत पोहोंचला व त्याला धरले.मग तो पेत्रास म्हणाला, ‘‘अरे अल्पविश्वासी माणसा, तू संशय का धरलास?’’

जेंव्हा पेत्र आणि येशू दोघे नावेमध्ये चढले, तेंव्हा लगेच वारा थांबला आणि पाणी शांत झाले.हे पाहून शिष्यांना मोठे आश्चर्य वाटले.त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.’’