unfoldingWord 11 - वल्हांडण सण

રૂપરેખા: Exodus 11:1-12:32
સ્ક્રિપ્ટ નંબર: 1211
ભાષા: Marathi
પ્રેક્ષકો: General
હેતુ: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
સ્થિતિ: Approved
સ્ક્રિપ્ટો અન્ય ભાષાઓમાં અનુવાદ અને રેકોર્ડિંગ માટે મૂળભૂત માર્ગદર્શિકા છે. દરેક અલગ-અલગ સંસ્કૃતિ અને ભાષા માટે તેમને સમજી શકાય તેવું અને સુસંગત બનાવવા માટે તેઓને જરૂરી અનુકૂલિત કરવા જોઈએ. ઉપયોગમાં લેવાતા કેટલાક શબ્દો અને વિભાવનાઓને વધુ સમજૂતીની જરૂર પડી શકે છે અથવા તો બદલી અથવા સંપૂર્ણપણે છોડી દેવામાં આવી શકે છે.
સ્ક્રિપ્ટ ટેક્સ્ટ

देवाने फारोला सांगितले की जर तो इस्राएल लोकांना जाऊ देणार नाही, तर देव मिसरातील प्रथम जन्मलेल्या मनुष्यांस व प्राण्यांस जीवे मारील.जेव्हा फारोने हे ऐकले तेव्हाही त्याच्यावर काही परिणाम झाला नाही व त्याने इस्राएलास सोडले नाही.

जो कोणी देवावर विश्वास ठेवील त्याच्या घरातील प्रथम जन्मलेल्यास वाचविण्यासाठी देवाने मार्ग काढला.प्रत्येक कुटुंबाला एक निष्कलंक कोकरु निवडायचे होते आणि ते वधायचे होते.

देवाने इस्राएलास सांगितले की त्यांनी कोक-याचे कांही रक्त त्यांच्या घराच्या दरवाजाच्या चौकटीस लावावे, आणि त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकरी व कडू भाजी बरोबर घाईघाईने खावे.त्याने त्यांना भोजन झाल्यानंतर मिसर देश सोडण्यास तयार राहण्यासही सांगितले.

देवाने सांगितल्याप्रमाणे इस्राएलांनी सर्व तयारी केली.मध्यरात्री, देवाने जाऊन मिसरातील प्रत्येक कुटुंबातील प्रथम जन्मलेल्या पुत्रास मारले.

इस्राएलाच्या सर्व घरांच्या चौकटीवर कोक-याचे रक्त असल्यामूळे देव त्या घरांना ओलांडून गेला. त्या घरातील सर्वजण सुरक्षित होते.कोक-याच्या रक्तामुळे त्यांचा बचाव झाला होता.

परंतु मिस-यांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.म्हणून देवाने त्यांचे घर ओलांडले नाही.देवाने मिसरातील प्रत्येक प्रथम जन्मलेल्यांस जीवे मारले.

तुरुंगातील प्रथम जन्मलेल्या मुलापासून ते फारोच्या घरातील प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत प्रत्येक मिसरी पुरूष मरण पावला.मिसर देशातील पुष्कळ लोक खुप दुःखाने रडत व विव्हळत होते.

त्याच रात्री, फारोने मोशे व अहरोनास बोलावून म्हटले, "इस्राएलांना घेऊन लगेच मिसर देश सोडा व आपल्या देवाची भक्ती (उपासना) करा.मिसरातील लोकांनीही इस्राएली लोकांना मिसर देश लगेच सोडण्याची विनंती केली.