unfoldingWord 14 - जंगलामध्ये भटकणे
إستعراض: Exodus 16-17; Numbers 10-14; 20; 27; Deuteronomy 34
رقم النص: 1214
لغة: Marathi
الجماهير: General
الغرض: Evangelism; Teaching
Features: Bible Stories; Paraphrase Scripture
حالة: Approved
هذا النص هو دليل أساسى للترجمة والتسجيلات فى لغات مختلفة. و هو يجب ان يعدل ليتوائم مع اللغات و الثقافات المختلفة لكى ما تتناسب مع المنطقة التى يستعمل بها. قد تحتاج بعض المصطلحات والأفكار المستخدمة إلى شرح كامل أو قد يتم حذفها فى ثقافات مختلفة.
النص
देवाने इस्राएल लोकांशी केलेल्या कराराचा भाग म्हणून जे नियम त्यांना पाळण्यासाठी दिले होते ते सांगून झाल्यानंतर त्यांनी सीनाय पर्वत सोडला.देव त्यांना वचनदत्त देशाकडे, ज्याला कनान देश सुदधा म्हटले जायचे त्याकडे त्यांना घेऊन जात होता.कनान देशाकडे जात असतांना मेघस्तंभ त्यांच्यापुढे गेला व ते त्यांच्या पाठीमागे गेले.
देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते की त्यांच्या वंशजांना तो वचनदत्त देश देईल, पण आता त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक राहत होते.त्यांना कनानी असे म्हणत असत.कनानी लोक देवाची आराधना करीत नव्हते व त्याची आज्ञा मानत नव्हते.ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
देव इस्राएलास म्हणाला, "वचनदत्त देशामधील कनानी लोकांचा तुम्ही पुर्णपणे नाश करा.त्यांच्याशी शांतीने वागू नका व त्यांच्याशी विवाह करू नका.तुम्ही त्यांच्या सर्व मूर्त्यांचा समूळ नाश करा.जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाही, तर तुम्ही माझ्याऐवजी त्यांच्या मूर्त्यांच्या पाया पडाल ."
जेव्हा इस्राएल लोक कनान देशाच्या सीमेवर आले, तेव्हा मोशेने इस्राएलाच्या बारा वंशामधून प्रत्येकी एक अशा बारा मनुष्यांस निवडले.त्याने त्या मनुष्यांस कसे जावे व देश कसा हेरावा याविषयी सुचना देऊन तो देश कसा आहे हे बघायला सांगितले.कनानी लोकांवरतीही हरगिरी करुन ते शक्तिशाली आहेत की दुर्बल आहेत हे पाहायला सांगितले.
ही बारा माणसे चाळीस दिवस कनानात फिरली व परत आली.त्यांनी लोकांस सांगितले. "जमीन एकदम सुपीक आहे व पिकपाणी भरपूर आहे.परंतु दहा हेर म्हणाले, "शहरे खूप मजबूत व तटबंदीची आहेत तेथिल लोक धिप्पाड आहेत!"जर आपण त्यांच्यावर हल्ला केला तर ते निश्चितच आपला पराभव करतील व आपणांस जीवे मारतील!"
लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.देव आमच्या बाजूने लढेल!"
परंतु लोकांनी कालेब व यहोशवाचे ऐकले नाही.ते मोशे व अहरोनावर भडकले व म्हणाले, "तुम्ही आम्हांस अशा भयानक ठिकाणी का आणिले?"इथे युद्धामध्ये मरणे व आमच्या बायका व मुले यांना गुलाम बनण्यापेक्षा मिसर देशामध्ये राहणे हे बरे होते.आपणांस पुन्हा मिसर देशामध्ये घेऊन जाईल असा वेगळा नेता त्यांना निवडायचा होता.
हे पाहून देव रागावला व दर्शनमंडपाजवळ आला.देव म्हणाला, "तुम्ही माझ्याविरूद्ध बंड पुकारल्यामुळे आता तुम्हा सर्वांना ह्या जंगलामध्ये भटकावे लागेल.फक्त यहोशवा आणि कालेब, यांना सोडून बाकी सर्व वीस वर्षाचे व वीस वर्षांवरील लोक या जंगलामध्येच मरतील व त्यांचा वचनदत्त देशामध्ये प्रवेश होणार नाही.”
लोकांनी हे ऐकल्यावर, त्यांना असे केल्याचे दुःख झाले.त्यांनी आपली हत्यारे घेतली व कनानी लोकांविरूद्ध लढाई करायला गेले.मोशेने त्यांना सावध केले व म्हटले की जाऊ नका कारण देव त्यांच्याबरोबर नव्हता, तरी त्यांनी त्याचे ऐकले नाही.
या युद्धामध्ये देव त्यांच्याबरोबर गेला नव्हता, म्हणून त्यांचा पराभव झाला व बरेच जण मृत्युमुखी पडले.मग इस्राएली लोक कनानमधून परतले व चाळीस वर्षे जंगलामध्ये भटकत राहिले.
त्यांच्या या चाळीस वर्षाच्या भटकंतीच्या समयी देवाने जंगलामध्ये देखिल त्यांच्या सर्व गरजा पुरविल्या.त्याने त्यांना स्वर्गातील भाकर ज्याला त्यांनी "मान्ना" म्हटले ती खावयास दिली.त्याने त्यांच्या तंबूमध्ये लावा पक्षांचे(हे पक्षी मध्यम आकाराचे असतात) थवे पाठविले, अशासाठी की त्यांना मांस खावयास मिळावे.या काळामध्ये, देवाने त्यांची वस्त्रे फाटू दिली नाहीत व त्यांची पादत्राणेही झिजू दिली नाहीत.
देवाने आश्चर्यकारक रितीने त्यांना खडकामधून पाणी दिले.पण तरीहि इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली.तरीदेखील देव अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दिलेल्या अभिवचनाविषयी विश्वासू राहिला.
अजून एकदा जेव्हा लोकांना प्यावयास पाणी नव्हते, तेव्हा देव मोशेस म्हणाला, "खडकाशी बोल, म्हणजे त्यातून पाणी निघेल."परंतु त्या खडकास आज्ञा करण्याऐवजी त्याने दोनदा त्या खडकावर काठी मारून सर्व लोकांसमोर देवाचा अनादर केला.सर्वांना पिण्यासाठी खडकातून पाणी आले, परंतु देव मोशेवर रागावला आणि म्हणाला, "तू वचनदत्त देशात प्रवेश करणार नाहीस."
चाळीस वर्षे इस्राएल लोक जंगलामध्ये भटकले, ज्या इस्राएलांनी देवाविरूद्ध बंड केले, ते सर्व तेथेच मरण पावले.मग देवाने लोकांस पुन्हा त्या वचनदत्त देशाकडे येण्यास त्यांचे मार्गदर्शन केले.मोशे आता वयोवृद्ध झाला असल्यामूळे परमेश्वराने लोकांचे नेतृत्व करण्यास त्याची मदत करण्यासाठी यहोशवाची निवड केली.देवाने मोशेस हेही आश्वासन दिले की एक दिवस त्याच्या सारखाच दुसरा संदेष्टा देव पाठविल.
मग देवाने मोशेस अबीराम पर्वताचे नबो नामक शिखरावर जाऊन वचनदत्त देश पाहावयास सांगितले.मोशेने वचनदत्त देश पाहिला, परंतु देवाने त्यास तेथे प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही.मग मोशे मरण पावला व इस्राएलांनी चाळीस दिवस त्याच्यासाठी शोक केला.यहोशवा त्यांचा नविन नेता बनला.यहोशवा एक चांगला नेता झाला कारण त्याने देवावर विश्वास ठेविला व त्याच्या आज्ञा पाळल्या.